Chhagan BHujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : `ओबीसी`साठी लवकरच सावित्रीबाई फुले आधार योजना!

Sampat Devgire

OBC scheme news : ‘सारथी’, ‘बार्टी’ आणि ‘तार्ती’प्रमाणे महाज्योतीला त्याचप्रमाणे खुला, मागासवर्गीय आणि अनुसूचित जमातीप्रमाणे इतर मागासवर्गाच्या महामंडळाला समान निधी देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ विभागाला दिले आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. (Dy CM Ajit Pawar assures funds on the basis of baarti)

ओबीसी (OBC) घटकांसाठी समाज निधी देण्याचे आश्वसान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. याबाबत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माहिती दिली.

मंत्री छगन भुजबळ आणि इतर मागासवर्गीय व बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसोबत बैठक झाली.

स्वयम आणि स्वाधारच्या धर्तीवर इतर मागासवर्गीयांसाठी सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करणे आणि इतर मागासवर्ग विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब, ड व विषेश मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना लागू करण्यासाठी कॅबिनेट समोर विषय घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री (अर्थ व नियोजन) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आर्थिक वर्षे २०२३-२४ वर्षाच्या अर्थसंकल्पात सारथी, बार्टी आणि तार्ती ला ३०० कोटी रुपये निधी अर्थसंकल्पीत केला होता. मात्र त्या तुलनेत सुमारे ५४ टक्के लोकसंख्या असलेल्या इतर मागासवर्गाच्या महाज्योतीसाठी केवळ ५५ कोटी निधी अर्थसंकल्पीत केलेला होता.

अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ आणि महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाला अनुक्रमे ३०० व २०० कोटी निधी अर्थसंकल्पीत केला होता. मात्र इतर मागासवर्ग विकास महामंडळाला केवळ ४७.५० कोटी निधी अर्थसंकल्पीत केल्याची अन्यायकारक बाब मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निदर्शनास आणून दिली.

सर्वांना समान न्याय मिळण्याची मागणी केली. निधीच्या बाबतीत इतर मागास प्रवर्गावर झालेला अन्याय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्षात आल्यानंतर त्यांनीसुध्दा आश्चर्य व्यक्त करुन आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाज्योती आणि ओबीसी महामंडळाला अधिकचा निधी देण्यासाठी पुरवणी मागण्यांद्वारे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना अर्थ विभागाला दिल्या.

आदिवासी विकास विभागाची स्वयंम व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील २१,६०० विद्यार्थ्यांना आधार योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा देण्याच्या योजनेस मंजूरीसाठी राज्यमंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव आणण्याचा या बैठकीत निर्णय झाला.

या बैठकीला अर्थ विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, इतर मागासवर्ग विभागाच्या प्रधान सचिव अन्शु सिन्हा,नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT