Dharashiv Maratha Reservation : जरांगेंच्या आवाहनानंतर धाराशिवचे अक्षय नाईकवाडींचे उपोषण स्थगित

Maratha Reservation : सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायला पाहिजे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. तो एक महिन्याचा वेळ सरकारला दिला आहे आणि आमचं उपोषणही स्थगित करत आहोत.
Dharashiv Maratha Reservation :
Dharashiv Maratha Reservation : Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अक्षय नाईकवाडी यांनीही आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर सहाव्या दिवशी त्यांनी आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे यांनीही काल उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्यानंतर नाईकवाडी यांनीही उपोषण स्थगित करत असल्याची माहिती दिली.

सरकारला एक महिन्याचा वेळ द्यायला पाहिजे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. तो एक महिन्याचा वेळ सरकारला दिला आहे आणि आमचं उपोषणही स्थगित करत आहोत. पण एक महिन्यानंतर आरक्षण मिळालं तर दिवाळी नाहीतर सरकारची होळी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी तिखट प्रतिक्रिया नाईकवाडी यांनी दिली आहे.

Dharashiv Maratha Reservation :
Aamshya Padavi News: नंदुरबार अमली पदार्थमुक्त जिल्हा? आमदार पाडवींनी पोलिसांचा दावा खोटा ठरवला; खुलेआम विक्री

तसेच, जिल्हाभरातील ग्रामपंचायती आणि विविध संघटनांचाही आमच्या उपोषणाला पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारने कोणताही वेळकाढूपणा न करता आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, एवढच सांगतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजातील काही लोकांनीही उपोषणाला सुरुवात केली, पण काल जरांगेंनी एक महिन्याचा वेळ देत उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले. त्यानंतर अनेकांनी आपापले उपोषणही स्थगित केलं.

दरम्यान, मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करत मनोज जरांगेंनी सरकारचा आदेश धुडकावला. कायद्याच्या पातळीवर टिकवण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अभ्यासाची गरज आहे. सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला.

याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करत मराठ्यांवर खापर फुटू नये, यासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ देत दोन पावले मागे घेण्याचा निर्णय जरांगेनी घेतला. पण एक महिन्यानंतर काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल, नाहीतर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Dharashiv Maratha Reservation :
Harshvardhan Jadhav In Antarwali : जरांगे मागताहेत ते आरक्षण टिकणारे नाही, हर्षवर्धन यांचा अंतरवालीत येत दावा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com