Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आदिवासी भागात रस्त्यांसाठी कार्यक्रम राबवणार!

Sampat Devgire

नाशिक : आदिवासी भागात (Trible Area) अनेक गावे, वस्त्या, वाड्या, रस्ते विकासापासून (Undevolop) वंचित आहेत. या भागात बारमाही रस्ते करण्यासाठी राज्य शासनाकडून (Shinde Government) कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. (CM Eknath Shinde annonuce special drive for truble area roads)

केंद्राच्या धर्तीवर राज्यातही आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी अनुसूचित जनजाती आयोग स्थापन करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील आदिवासी समुदायाच्या कला संस्कृतीचे स्वातंत्र्यलढ्यातील, तसेच राष्ट्राच्या निर्मितीतील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरणासाठी मंगळवारी आदिवासी विभागामार्फत आयोजित जनजातीय गौरव दिन व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचे योगदान लक्षात घेऊन जनजाती गौरव दिन साजरा केला जातो. आदिवासी बांधवांनी केवळ आपली संस्कृती जतन केली नाही, तर या जंगलातील निसर्गसंपदाही जतन केली आणि त्याचं संवर्धनदेखील केलेले आहे. आदिवासी भागातील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यामध्ये न जोडलेली गाव, पाडे-वाड्यावर वस्ती यांना रस्त्याने जोडणारे, तसेच जे रस्ते सहामायी आहेत, ते बारमाही करण्यासाठी राज्य सरकार पुढील काळात कालबद्ध कार्यक्रम तयार करेल.

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित होते. आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, आमदार सुहास कांदे, सीमा हिरे, हिरामण खोसकर, मंजुळा गावित, दिलीप बोरसे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT