Raju Shetty Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Irshalwadi Landslide: शेट्टींचा दावा, इर्शाळवाडी दुर्घटनेत ७० ते ८० लोकांचा बळी?

Sampat Devgire

Raju Shetty : रायगडमधील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल (बुधवारी) मध्यरात्री घडली. यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत विविध स्तरावर दु:ख व्यक्त होत आहे. याबाबत सरकार माहिती दडवते आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. याबाबत प्रशासनाने पुरेशी दक्षता घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. (There are some Advance notices are avail in such cases)

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी रायगडच्या इर्शाळवाडी येथील दुर्घटनास्थळी तातडीने मदतकार्य व पुरेशी यंत्रणा पोहचण्यासाठी सध्या प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, या घटनेला सरकारी अनास्था जबाबदार आहे. अशा दुर्घटनेचे संकेत मिळाले असतात, जमिनीला भेगा पडलेल्या असतात, असे विविध संकेत शाश्त्रीयदृष्ट्या त्याचा विचार करायला हवा असतो.

राज्य शासन आता म्हणेल की, आम्ही स्थानिक नागरिकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र तेव्हढे पुरेसे नसते. नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती का? असा प्रश्न त्यांनी केला.

जिथे दरड कोसळण्याची शक्यता आहे त्यांना नवीन घर बांधून देने गरजेचे होते. सरकार आकडा सांगत नाही पण ७० ते ८० लोकांचा बळी गेला आहे, असे मला वाटते. याला पुर्णतः सरकार जबाबदार आहे, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी. धोकादायक वस्त्या आहेत, त्याबाबत कारवाई होणे अपेक्षित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT