Irshalwadi Landslide Helpline: इर्शाळवाडी दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, २१ जखमी; चिखलामुळे मदतकार्यात अडथळे, मदतीसाठी हेल्पलाईन

Irshalwadi Landslide Rescue Operation: एनडीआरफचे १५० जवान आणि सीडकोचे ५०० मजूर घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. त्यांना पनवेलचा ट्रेकर्स ग्रुप, यशवंती ट्रेकर्स, निसर्ग ग्रुपचे टेकर्सचे तरुण बचाव कार्यात मदत करत आहेत.
Irshalwadi Landslide
Irshalwadi LandslideSarkarnama

Raigad News: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी (ता. १९ जुलै) रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान दरड कोसळली. त्या दुर्घटनेत सकाळी सव्वादहापर्यंत दहा जणांचे मृतदेह आढळले आहेत. तेथील ७० लोक सुरक्षित आहेत. जखमी २१ पैकी १७ लोकांवर बेस कॅम्पमधील रुग्णायात उपचार करण्यात येत आहेत, तर सहा लोकांना पनवेलमधील एमजेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज सकाळी दिली. (10 people died, 21 injured in Irshalwadi)

दरम्यान, एनडीआरफचे १५० जवान आणि सीडकोचे ५०० मजूर घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. त्यांना पनवेलचा ट्रेकर्स ग्रुप, यशवंती ट्रेकर्स, निसर्ग ग्रुपचे टेकर्सचे तरुण बचाव कार्यात मदत करत आहेत. वैद्यकीय पथक चालत जाऊन घटनास्थळी पोचले आहे

इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळून काही लोक दरडीखाली अडकल्याची भीती आहे. तेथे ४८ कुटुंब वास्तव्यास, त्यापैकी २५ ते २८ कुटुंब बधित झाली आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे. गावातील २२८ पैकी ७० नागरीक सुरक्षित आहेत. जखमी २१ पैकी १७ लोकांवर बेसकॅम्पमधील रुग्णायात उपचार करण्यात आले आहेत. सहा लोकांना पनवेलमधील रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळी सव्वादहापर्यंत दहा जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

Irshalwadi Landslide
Irshalgad Accident News : इर्शाळवाडी दुर्घटनेची अमित शहांनी घेतली दखल, मुख्यमंत्री शिंदे चर्चा करत मदतीचं आश्वासन!

फडणवीस म्हणाले की, सततच्या पावसामुळे घटनास्थळी चिखल झाला आहे. त्यामुळे एनडीआरएफचे जवान आणि सीडकोचे मजूर यांच्याकडून कार्यवाही सुरू आहे. एनडीआरएफच्या दोन टीम म्हणजेच ६० जवान पहाटे चार वाजता पोचले, त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. स्नायफर डॉग स्क्वॉडही घटनास्थळी पोचला आहे.

मुंबईतून हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर बचाव कार्यासाठी तयार आहेत. पण, खराब हवामानामुळे ते उड्डाण करु शकत नाहीत. स्थानिक प्रशासनाने पायथ्याशी तात्पुरते हेलिपॅड तयार केले आहे. ते हवामान अनुकूल होण्याची वाट पाहत आहेत. जेसीबीही घटनास्थळी नेता येत नाहीत. एअरलिफ्ट करून जेसीबी मशिन घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पायलट यांच्याकडून तशी पाहणी केली जात आहे. पायथ्यापासून घटनास्थळी जाण्यासाठी दीड तास लागतात. फक्त तरुण लोकच घटनास्थळी जाऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

Irshalwadi Landslide
Khalapur Irshalgad Landslide: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा !

गिरीश महाजन पहाटे सव्वातीनला घटनास्थळी पोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सकाळीच त्या ठिकाणी पोचले आहेत. मी आणि अजित पवार मुंबईच्या आपत्कालीन कक्षाच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहोत. मंत्री अदिती तटकरे, उदय सामंत आणि दादा भुसे हेही घटनास्थळी जाऊन काम पाहत आहेत. तेथील लोकांची व मदत करणाऱ्या लोकांची जेवणाची व इतर व्यवस्थेसंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बैठक घेतली आहे

अमित शहांनी घेतली माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माहिती घेतली. त्यांच्याकडून मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. वैद्यकीय उपचाराचे वाहन सकाळीच घटनास्थळी पोचले आहे. ही माहिती दूरध्वनी आणि ईमेलवरून मिळाली आहे.

Irshalwadi Landslide
Raigad Irshalgad Landslide: ७५ जणांना वाचवण्यात यश, पाच जणांचा मृत्यू; फडणवीसांनी दिली माहिती !

संपर्क व माहितीसाठी हेल्पलाईन

घटनास्थळ दुर्गम ठिकाणी असल्याने कोणत्याही वाहनाने त्या ठिकाणी पोचणे अवघड आहे. त्यामुळे डोंगरपायथ्याशी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. संपर्क व मदतीसाठी ८१० ८१९ ५५५४ अशी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पनवेलचा ट्रेकर्स गुप्र, यशवंती ट्रेकर्स, निसर्ग ग्रुपचे टेकर्सचे तरुण बचाव कार्यात सहभागी झाले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com