BJP leader Girish Mahajan
BJP leader Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

रुग्णांसाठी राज्य शासनाकडून एक रुपयाही मदत नाही!

Sampat Devgire

यावल : महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule scheme) योजनेंतर्गत रुग्णांवर उपचारासाठी गेल्या दीड दोन वर्षात गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी राज्य शासनातर्फे (Maharashtra Government) एकही मदत देण्यात आली नसल्याचा आरोप माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. (Maharashtra Government doesn`t give any asistance for medical help)

येथील जनसेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. महाजन उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत रुग्णांवर उपचारासाठी ८० टक्के निधी केंद्राकडून तर २० टक्के निधी राज्य सरकारकडून मिळत असतो. दुर्देवाने गेल्या दीड-दोन वर्षात गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी राज्य शासनातर्फे एकही मदत देण्यात आली नसल्याचा आरोप श्री. महाजन यांनी केला.

यावेळी खासदार रक्षा खडसे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, कांचन फालक, किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश धनके आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक आई हॉस्पिटलचे संचालक तथा आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी केले. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी फीत कापून हॉस्पिटलचे उद्‌घाटन केले. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, माजी जि. प. सदस्य हर्षल पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी यांची भाषणे झाली. आमदार चौधरी म्हणाले, की राजकारणात स्पर्धा निकोप असावी. रुग्णांची सेवा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोणीही बदनाम करू शकत नाही. असेही श्री. चौधरी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर सर यांनी केले, तर आभार हिरालाल चौधरी यांनी मानले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT