सुप्रिया सुळे म्हणाल्या, करायला गेले एक झाले भलतेच!

मनसेच्या भोंग्यांविरोधातील आंदोलनाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया.
Supriya Sule, NCP leader
Supriya Sule, NCP leaderSarkarnama
Published on
Updated on

नाशिक रोड : करायला एक गेले झाले भलतेच. त्याचा परिणाम शिर्डीचा भोंगा पहिले खाली आला, अशी प्रतिक्रिया भोंगा प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) भोंग्यांविरोधातील आंदोलनाबाबत (Raj Thakre Agitation) त्यांनी ही प्रतिक्रीया व्यक्त केली. (Supriya Sule said, MNS Think diffrent & happen something else)

Supriya Sule, NCP leader
अभिनेत्री केतकी चितळेची महाराष्ट्रभर परेड होणार?

येथील अशोका मार्ग येथे वेस्टर्न इंडिया रिजनल काऊन्सिल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडिया संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Supriya Sule, NCP leader
राज ठाकरे म्हणाले, निर्धास्त रहा, मी तुमच्या पाठीशी!

या वेळी व्यासपीठावर माजी आमदार हेमंत टकले, कोषाध्यक्ष पियुष चांडक, नाशिक शाखा अध्यक्ष सोहील शाह, नाशिक शाखा सचिव संजीवन तांबुळवाडीकर, नाशिक शाखा उपाध्यक्ष राकेश परदेशी, नाशिक शाखा कोषाध्यक्ष जितेंद्र फाफट, ज्येष्ठ सभासद शिवदास डागा उपस्थित होते.

या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले, की आज महागाईचा प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवा. महागाई वाढत जाणार आहे, असे अनेक वेळा प्रधानमंत्री मोदी यांना सांगितले. देश आधी असतो नंतर राजकारण. सर्वांना राजकीय मतभेद वेगळे ठेवून देशाचा विचार करावा लागणार आहे. कोविडमध्ये इंजेक्शन व औषधे घेताना औषध निर्मात्याची आपण कधीच जात पहिली नाही.

या वेळी विविध क्षेत्रातील उद्योजक व सीए यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधत सरकारी अनुदान असणाऱ्या उद्योगांना सबसिडी संदर्भात विविध अटी शिथिल केले पाहिजे, अशी विनंती केली. या वेळी सुळे यांनी सभागृहात यासंबंधी नक्कीच प्रश्न मांडू, असे आश्‍वासन दिले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com