नाशिक : भाजप सरकारच्या काळात शेतकयांसाठी राबविण्यात आलेल्या योजना बंद करून (Present state government is closing down BJP government shcemes) शेतकयांची कोंडी करण्याचा राज्यातील महाविकास आघाडीचा कट उघड झाला असून जलयुक्त शिवार योजनेचा शेतकयांना लाभ झाल्याचा अहवाल नुकताचं जलसंधारण विभागाने दिला आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी सरकारी चेहरा उघड झाला असून योजना संदर्भात गैरसमज पसरविणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची माफी मागीवी अशी मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP spoaks persone Keshav Upadhey) यांनी केली.
भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात माध्यम प्रतिनिधीसंमवेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपाध्ये बोलतं होते. ते म्हणाले, जलयुक्त शिवारामुळे राज्यात भुजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होवून शेतकयांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे. तसा अहवाल जलसंधारण विभागाने सादर केला आहे. परंतू द्वेषापोटी महाविकास आघाडी सरकारने जनहीताच्या योजनांना स्थगिती देवून जाणीवपुर्वक नागरिकांना दुर ठेवले आहे. राजकीय द्वेषापोटी या योजनांची बदनामी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्याचं जलसंधारण खात्याने महालेखाकारांच्या अहवालातील आक्षेपांवर उत्तर देताना योजनेस क्लीन चीट दिली. द्वेषी राजकारणामुळे जनहिता विरोधी सरकारची निती स्पष्ट झाली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जनतेच्या हिताची व विकासाची एकही नवी योजना राज्य सरकारने आखली नाही, उलट जनहिताच्या योजना बंद करून अथवा स्थगिती देऊन जनतेचे तसेच राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान केले आहे. अहंकारापोटी मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्याची किंमत आज मुंबईकरांना मोजावी लागत आहे.
यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीष पालवे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगुरकर, सुनिल केदार, विजय साने, प्रविण अलई, गोविंद बोरसे आदी उपस्थित होते.
द्वेषामुळे एसटी कर्मचारी देशोधडीला
ग्रामिण भागात जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळालाही सरकारने वेठीस धरले असून परिवहन मंत्र्यांनी अनधिकृत बंगल्यांवर करोडोंचा खर्च केला, पण गरीब एसटी कर्मचाऱ्यास पगार देताना मात्र हात आखडता घेतला. सरकारी धोरणामुळे एसटी कर्मचारी आज देशोधडीस लागला असून अनेक कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. वेतनावाचून सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यास तुटपुंजी पगारवाढ देऊन त्यांची थट्टा करणाऱ्या परिवहन मंत्र्यांना पगारवाढीच्या करारातही टक्केवारी मिळाली नाही का, असा खोचक सवालही उपाध्ये यांनी केला. एसटी महामंडळास तोट्यात दाखवून एसटीचे खाजगीकरण करण्याचा व महामंडळाची कोट्यवधींची मालमत्ता घशात घालण्याचा कट असल्याचा आरोप केला.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.