Shahapur Samruddhi Accident: समृध्दी महामार्गाचे काम सुरळीत सुरू आहे. याबाबत घाई, गडबड होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. शहापूर येथील अपघाताची कारणे शोधली जातील, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
शहापूर येथील पुलाचे (Samruddhi Highway) काम अतिशय उच्च तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहे. हा अपघात कसा झाला, याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) घटनास्थळी पाहणी केली आहे, अशी माहिती मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली.
या महामार्गाचे काम येत्या २०२४ पर्यंत हे पूर्ण करायचे आहे. ही सर्व कामे अतिशय उच्च तंत्रज्ञान वापरून केली जात आहे. शहापूर येथील अपघात रात्री आणि दिवसा कोणती व काय काम करायचे आहे, ते पाहूनच सुरू होते, असे त्यांनी सांगितले.
श्री. भुसे म्हणाले, या पुलाचे काम सुरू असताना हा अपघात झाला आहे. सिंगापूर येथील यंत्रणाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत होते. याआधी या संस्थेकडून ९४ पुलांचे काम यशस्वीपणे झाली आहेत. मात्र दुदैवाने शहापूर परिसरात काल मध्यरात्री ही दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील जखमींवर शासकीय खर्चात उपचार केले जाणार आहे.
ते म्हणाले, या अपघातात तीघे जखमी आहेत. अजून कोणी क्रेनच्या खाली अडकले आहे का?, याबाबत शोध सुरू आहे. शोध कार्य झाल्यावर ही घटना कशी घडली, याबाबत चौकशी केली जाईल. जखमींवर शहापूर आणि ठाणे येथे उपचार सुरू आहे. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य शासन करेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.