Bhujbal & Bhuse News : शेतकऱ्यांच्या आंदोलनावर दादा भुसे, भुजबळांच्या चेहऱ्यावरची रेषही हलेना!

Guardian Minister Dada Bhuse kept himself detached from farmers agitation-शेतकऱ्यांच्या उपोषणापासून पालकमंत्र्यांनी अलिप्त राहणेच पसंत केले.
Narhari Zirwal, Chhagan Bhujbal & Dada Bhuse.
Narhari Zirwal, Chhagan Bhujbal & Dada Bhuse.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Narhari Zirwal News : जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमीनींच्या लिलावाच्या धोरणाविरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. याबाबत हस्तक्षेप करा, ते आंदोलन थांबवा, अशी विनंती आज विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी केली. (Farmers withdraw there agitation after NDCC bank MD`s assurance)

नाशिक (Nashik) जिल्हा बँकेच्या विरोधात शेतकरी (Farmers) आंदोलन सुरू आहे. त्याबाबत नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे लक्ष वेधले. याबाबत हस्तक्षेप करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी त्यावर काहीच प्रतिक्रीया दिली नाही.

Narhari Zirwal, Chhagan Bhujbal & Dada Bhuse.
NCP Nashik News : मनोहर भिडे यांच्याकडे दुर्लक्ष नको, कारवाई करा!

भर पावसात गेल्या आठवडयापासून शेतकरी जिल्हा रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करीत आहे. यातील दोन शेतकऱ्यांनी अन्नत्याग देखील केला होता. जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

यातील काही शेतकऱ्यांच्या जमीनींचे बँकेने हस्तांतरण केले. त्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे. मात्र त्याबाबत कोणत्याही यंत्रणेने त्याची दखल घेतली नव्हती. आज बँकेच्या प्रशासकांच्या भेटीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती. यावेळी मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. यावेळी श्री. झिरवाळ यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यात हस्तक्षेप करावा. त्या शेतकऱ्यांची भेट घ्यावी अशी विनंती केली. बराच वेळ ते शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलत होते.

Narhari Zirwal, Chhagan Bhujbal & Dada Bhuse.
पुण्यातून सुषमा अंधारेचा मोदींवर हल्लाबोल | Sushma Andhare On PM Narendra Modi | #shorts

मात्र या दरम्यान पालकमंत्री भुसे आणि श्री. भुजबळ यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. त्यांनी एव्हढी तटस्थ भूमिका घेतली, की त्यावर एक शब्दही बोलले नाही. त्यामुळे उपस्थित लोप्रतिनिधी देखील आश्चर्यचकीत झाले.

बैठक संपल्यानंतर श्री. भुजबळ पुढील कार्यक्रमाला निघून गेले. पालकमंत्री भुसे यांनी आपल्याला मुंबईत बैठक असल्याचे कारण सांगत शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे जाण्याचे टाळले. त्यांनी जिल्हा बँकेचे प्रशासक श्री. चव्हाण आणि उपनिबंधक फैय्याज मुलानी यांना शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्याचा निरोप दिला.

Narhari Zirwal, Chhagan Bhujbal & Dada Bhuse.
Narhari Zirwal : वादग्रस्त अधिकाऱ्यांवर नरहरी झिरवाळांची कृपादृष्टी?

जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी गंभीर विषय असलेल्या थकबाकीदारांच्या जमीनींच्या लिलावाच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी यापूर्वी देखील आश्वासन दिले होते. मात्र बँकेने लिलाव थांबवेले नाहीत. आज पालकमंत्री कदाचीत त्यामुळेच आंदोलनापासून लांब राहिले असावे, असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.