NCP Nashik News : मनोहर भिडे यांच्याकडे दुर्लक्ष नको, कारवाई करा!

NCP & Samata Parishad agitation in Nashik against Manohar Bhide-राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेकडून मनोहर भिडे यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.
NCP agitation
NCP agitationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Manohar Bhide Controversy : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह तसेच तथ्यहीन वक्तव्य केल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मनोहर भिडे यांच्या विरोधात निदर्शने केली. (Maharashtra Government should take a serious action on Manohar Bhide)

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महात्मा फुले समता परिषदेच्या (Samata Parishad) पदाधिकाऱ्यांनी नाशिक (Nashik) शहरात मोनहर भिडे यांच्या विरोधात निदर्शने केली.

NCP agitation
Chhagan Bhujbal On Bawankule : छगन भुजबळ बावनकुळेंवर संतापले!

शिव प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अवमानजनक व खोटी विधान केली. त्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. मात्र त्यांच्या विरोधात कारवाईचे राज्य शासनाने कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून आंदोलन सुरूच आहे.

राज्य सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सोमवारी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.

NCP agitation
Narhari Zirwal : वादग्रस्त अधिकाऱ्यांवर नरहरी झिरवाळांची कृपादृष्टी?

भिडे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्या विरोधात कपोलकल्पीत अफवा पसरवणे तसेच अपशब्द वापरणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली, बाळासाहेब कर्डक यांनी केली.

मनोहर भिडे हे सातत्याने विशिष्ट व विघातक विचारसरणीचा पुरस्कार करण्यासाठी महापुरूषांविषयी अवमानकारक वक्तव्ये करतात. तरूणांची माथी भडकावण्याचे काम करतात. दंगली घडविण्याला उत्तेजन देतात. त्यामुळे राज्य सरकारने अशा प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

NCP agitation
Sharad Pawar Greets PM Modi : व्यासपीठावर पोचताच शरद पवार अन॒ नरेंद्र मोदी रमले हास्यविनोदात...

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मनोहर भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते नाना महाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, योगिता आहेर, रवींद्र पगार, माजी नगरसेविका कविता कर्डक आदी सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.