Zeeshan Siddique Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Zeeshan Siddique : राज्यात बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून झिशान सिद्दिकी यांचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

Maharashtra law and order : शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवा संकल्प शिबिरात राज्यातील बिघडलेल्या कायद्या सुव्यवस्थेवर मुंबईतील पक्षाचे माजी आमदार झिशान सिद्दिकी यांचे मोठे विधान.

Pradeep Pendhare

Shirdi News : राज्यातल्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी सरकारला घरचा आहेर दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या, सलमान खान यांच्या घराबाहेरील गोळीबार आणि अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्याच घरात झालेला जीवघेणा हल्ला या घटनांसह राज्यातील इतर घटना पाहिल्यास पाहिल्यास मुंबईसह राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. मुंबईसह बांद्रा हे पूर्वीसारखे सुरक्षित राहिलेली नाही, असे सांगताना गुन्हेगारी कृत्याला कोणताही जातीय रंग देऊ नये, अशी अपेक्षा झिशान सिद्दिकी यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी शिर्डी इथल्या नवसंकल्प शिबिराला हजेरी लावली. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुंबई बांद्रा आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत मोठे विधान केले आहे.

आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique) म्हणाले, "राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. परंतु त्याला जातीय रंग देणे चुकीचे आहे. मुंबई विशेष करून बांद्रा भागात, अशी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणे हे गंभीर आहे. त्याला जातीय अँगल देणे हे तर त्याहीपेक्षा भयंकर आहे. माझा परिवार एका मोठ्या हल्ल्यात सामोरा गेला आहे. त्याला एखादा कम्युनल अँगल देणे हे साफ चुकीचे आहे". गुन्हा हा गुन्हाच असतो. नागरिकांच्या सुरक्षेतेला प्राधान्य दिले पाहिजे आणि कायदा-सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. याला पहिले प्राधान्य पाहिजे, असेही झिशान सिद्दिकी यांनी म्हटले.

गुन्हेगारीविरुद्ध ॲक्शन गरजेची

मुंबई आणि बांद्रा हे आता पूर्वीसारखे राहिले नाही. तेथील कायदा-सुव्यवस्था हा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर नागरिक आवाज उठवत आहे. याबाबत काहीतरी करायला हवे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर लवकरच ॲक्शन घेतील असे अपेक्षा झिशान सिद्दिकी यांनी व्यक्त केली.

बांद्रा पूर्वीसारखा सुरक्षित नाही

मुंबई आणि बांद्रा हे गुन्हेगारीमुळे असुरक्षित झाले आहे का? यावर झिशान सिद्दिकी म्हणाले, "मुंबईच्या बांद्रा परिसरात आमचं लहानपण गेले आहे. परंतु पूर्वीच्या आणि आत्ताचे बांद्रा त्याच्यामध्ये फरक झालेला आहे. पूर्वी जेवढा बांद्रा सुरक्षित होता, तो आता राहिलेला नाही".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT