Dada Bhuse, Eknath Shinde & Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लॉटरी, आधीच दादा भुसे मंत्री, आता आमदार कांदे झाले राज्यमंत्री!

Suhas Kande; Shiv Sena Shinde's party's Gift, priorly cabinet, now MLA Suhas Kande become a Minister of State status-आमदार सुहास कांदे यांची विधिमंडळ समित्यांमध्ये विमुक्त व भटके कल्याण समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.

Sampat Devgire

Shivsena Eknath Shinde news: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेलेल्या बहुतांश आमदारांची चांदी झाली आहे. विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या विविध समित्यांवरील नियुक्तींमध्ये या आमदारांना संधी मिळाली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाची चलती आहे.

नाशिक जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे अवघे दोन आमदार आहेत. त्यामध्ये मालेगाव बाह्य मतदारसंघाचे दादा भुसे तर नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे यांचा समावेश आहे. या दोन्ही आमदारांना अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पक्षाने सरस संधी दिली आहे.

मंत्री दादा भुसे यापूर्वी नाशिकचे पालकमंत्री होते. सध्याच्या मंत्रिमंडळात त्यांची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता शिल्लक राहिलेल्या एकमेव आमदार सुहास कांदे यांची विधिमंडळाच्या विमुक्त व भटके कल्याण समितीच्या प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे.

नाशिक जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाचे दोनच आमदार आहेत त्यातही एक मंत्री तर दुसरा राज्यमंत्री त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. संदर्भात आमदार कांदे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन आभार मानले.

राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाची संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळे मिळाली आहे आगामी काळात या पदाच्या माध्यमातून या समितीचे काम अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न असेल विमुक्त जाती व भटक्या जमातींना न्याय देण्याचा आपला प्रयत्न असेल असे आमदार कांदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून बंडखोरी केली. त्यावेळी त्यांच्या समवेत आलेल्या आमदारांमध्ये सुहास कांदे यांचा देखील समावेश होता. मंत्री दादा भुसे हे मात्र सर्वात शेवटी या बंडात सहभागी झाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार कांदे यांनी माजी खासदार तसेच राज्यातील ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. तर संघातील निवडणूक चुरशीची आणि चर्चेची झाली होती. यातूनच आमदार कांदे यांची विधिमंडळाच्या समितीच्या प्रमुख पदी वर्णी लागल्याचे बोलले जाते.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT