Gulabrao Patil Vs Gulabrao Deokar : दोन गुलाबरावांमधील 'कॉंटे की टक्कर' थांबेना, आता परत काय झालं?

Jalgaon Politics News | गुलाबराव देवकरांना कोणताच पक्ष स्वीकारणार नाही अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
Gulabrao Deokar | Gulabrao Patil
Gulabrao Deokar | Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : जळगावच्या राजकारणात शिवसेनेचे गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) गुलाबराव देवकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीत दोघाही दिग्गज नेत्यांची हायव्होलटेज लढत महाराष्ट्राला पाहायला मिळाली. त्यात गुलाबराव देवकरांचा पराभव केल्यानंतर तरी गुलाबराव पाटील जरा शांतता घेतील असं वाटत होतं. मात्र दोघांमधील 'कॉंटे की टक्कर' आजूनही कायम आहे. पाटील हे देवकरांना लक्ष करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक दिवसांपासून त्यांचा प्रशप्रवेश रखडला आहे. त्यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. देवकरांना कोणताच पक्ष स्वीकारणार नाही अशी टीका पाटील यांनी केली आहे.

Gulabrao Deokar | Gulabrao Patil
Kunal Kamra update : कुणाल कामराला हायकोर्टाचा दिलासा; पोलिसांना दिले महत्वाचे आदेश, महाराष्ट्रात येणार

देवकरांनी मजुरांचे पैसे खाल्ले, निवडणुकीच्या वेळेला जिल्हा बँकेतून गुलाबराव देवकरांनी दहा कोटींचं कर्ज काढल्याचं उघडकीस आले आहे. निवडणुकीच्या काळात कर्ज काढून रोख पैसे ठेवणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोग व अँटी करप्शनकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

देवकरांनी इतरही अनेक घोटाळे केले असल्याचा आरोप पाटील यांनी केला. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांना आतमध्ये जावंच लागेल. मुळात त्यांना कुणी पक्षात घेणारच नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

Gulabrao Deokar | Gulabrao Patil
Vijay Shivtare : शिवतारेंनी टोचले शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान; ‘पुरंदरमध्ये झालं; पुण्यात करून दाखवा’

देवकरांनी केलेल्या कथित घोटाळ्यांची मालिकाच यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितली. ते म्हणाले, जिल्हा बँकेचे कर्ज घेऊन त्यांनी ते फेडलं नाही. बुलढाणा अर्बण बॅंकेचेही तसेच केलं. मजुरांचे पैसे त्यांनी खाल्ले, स्वत:च्या शालेय शिक्षण संस्थेत शिक्षक शिकवतात त्यांचा पगार दिला नाही. त्याच बरोबर कायद्याच्या चौकटीबाहेर 26 लाख रुपये भाड्याने देणे असेल, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर गुलाबराव देवकर यांना कोणताच पक्ष स्वीकारणार नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com