Kumbh Mela Politics: वाद साधूंचा, अखेर प्रशासनाने वादग्रस्त सुधीर पुजारी यांना बैठकीपासून दूर ठेवले!

Girish Mahajan; After Sadhus Warning, unauthorised sadhana Kept away from Kumbh Mela-नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकी संदर्भात काही अनधिकृत साधू आणि धार्मिक संस्था सक्रिय झाल्या होत्या.
Mahant Rajendradas & Girish Mahajan
Mahant Rajendradas & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela news: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. त्याचा अनुभव प्रशासनाला सुरुवातीलाच आला आहे. अधिकृत आणि अनधिकृत साधूंच्या वादामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ झाली. साधूंच्या वादाचा फटका प्रशासनाला बसला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात दोन दिवसांपूर्वी काही स्थानिक धार्मिक संस्था आणि साधूंची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली होती. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंध नसलेल्या विविध संस्था आणि साधू सहभागी झाले होते. त्यांचाच वरचष्मा या बैठकीत होता. त्याच्या विविध बातम्याही प्रसिद्ध झाल्या.

Mahant Rajendradas & Girish Mahajan
Girish Mahajan Politics: अखेर गिरीश महाजन यांची साधूंपुढे नतमस्तक, म्हणाले, ‘सांगाल तसेच करू’

त्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे पदाधिकारी आणि निर्मोही आनिचे प्रमुख महंत राजेंद्रदास यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. अनधिकृत आणि मान्यता नसलेल्या साधूंशी संपर्क केल्यास त्याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील. असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. हा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला होता.

Mahant Rajendradas & Girish Mahajan
Gulabrao Patil Vs Gulabrao Deokar : दोन गुलाबरावांमधील 'कॉंटे की टक्कर' थांबेना, आता परत काय झालं?

महंत राजेंद्रदास यांनी प्रामुख्याने सुधीरदास पुजारी या काळाराम मंदिराच्या परंपरागत पुजारी तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्था आणि इस्कॉन या संस्थेबद्दल इशारा दिला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन प्रामुख्याने आणि फक्त अखिल भारतीय आखाडा परिषद आणि त्याच्याशी संलग्न १३ आखाडे हेच करत असतात.

या संदर्भात कालपासूनच या वादाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे विविध यंत्रणा सजग झाल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने आज होणाऱ्या बैठकीत सहभागी होऊ नये, अशी माहिती सुधीर पुजारी आणि अन्य स्थानिक प्रतिनिधींना कळविली. या संदर्भात राज्यस्तरावरील देखील विविध संस्थांनी हीच सावध भूमिका घेतली.

या वादाचे पडसाद आज जिल्हाधिकारी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवरही होते. विकृत साधूंना वगळल्याने आजची बैठक सुरळीत झाली. आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक स्थानिक संस्थांनीही संबंधित अनधिकृत साधूंना सहभागी केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

सुधीर पुजारी हे निर्वाणी अनिचे महामंडलेश्वर असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र त्यांच्या वादग्रस्त आणि चुकीच्या कामकाजामुळे त्यांना निर्वाणी अनिने निरस्त केले आहे. त्यांचा आखाडा परिषद अथवा कोणत्याही अनिशी संबंध नाही, असे महंत राजेंद्र दास यांनी स्पष्ट केले आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com