Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe : श्रीरामपूर हत्या प्रकरण : सुजय विखे पाटील यांची दुबय्या कुटुंबीयांची भेट; 'माझी कृतीच बोलेल' सूचक इशारा!

Sujay Vikhe Patil visits Akash Dubayya's family, avoids public comments : श्रीरामपूर येथील युवा उद्योजक आकाश दुबय्या हत्या प्रकरणानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 13 आरोपींवर कारवाई केली.

Pradeep Pendhare

Akash Dubayya Murder Case : ​युवा उद्योजक आकाश दुबय्या यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दुबय्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली.

सुमारे तासभर त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत या कठीण काळात आपण त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

भेटीनंतर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी या प्रकरणावर सार्वजनिक भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, "या संवेदनशील विषयावर सध्या मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. अनेकांनी या विषयावर बोलून झाले आहे. मी केवळ बोलणारा नाही, तर कृती करणारा माणूस आहे. या प्रकरणात कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती कारवाई माझ्या कृतीतून दिसेल."

या भेटीदरम्यान हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत तसेच दुबय्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती घेण्यात आल्याचे समजते. विखे पाटील यांच्या भूमिकेनंतर पुढील तपासात पोलिस (Police) कोणती पावले उचलतात, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, श्रीरामपूर शहर व परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा तसेच श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलिसांनी संयुक्तरित्या कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या मोहिमेत एका रात्रीत 13 जणांवर कारवाई करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार 16 जुलै रोजी रात्री 8 ते 17 जुलै पहाटे 5 या कालावधीत ही मोहीम पार पडली. यामध्ये गुन्ह्यातील फरार आरोपी, न्यायालयीन वॉरंटधारक तसेच वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झालेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपींना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT