Shrirampur Police Inquiry : पोलिस-गुन्हेगार संगनमताचे आरोप! श्रीरामपूरच्या 17 कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी, 12 जणांची चौकशी सुरू; आकाश दुबय्या हत्येनंतरच्या माहितीने खळबळ

12 of 17 policemen face inquiry over alleged criminal Links : श्रीरामपूरमधील आकाश दुबय्या हत्या प्रकरणानंतर नागरिकांचा संताप कायम; आमदार हेमंत ओगले यांची संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी, एका कर्मचाऱ्याचे निलंबन
Shrirampur Police Inquiry
Shrirampur Police InquirySarkarnama
Published on
Updated on

Shrirampur Crime News : हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये गुन्हेगारीविरोधात नागरिकांचा रोष कायम असून, या पार्श्वभूमीवर पोलिस दलासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

गुन्हेगारांशी कथित संबंध असल्याच्या आरोपांवरून 17 पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 12 जणांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर यांनी दिली.

आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर शहरात नागरिकांनी सलग चार दिवस बंद पाळत निषेध नोंदवला. बुधवारी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान पोलिस (Police) दलातील कारवाई आणि चौकशीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

मोर्चादरम्यान काँग्रेसचे (Congress) आमदार हेमंत ओगले यांनी काही पोलिस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी अमोल गायकवाड, सागर बनसोडे, अमोल पडोळे आणि राहुल नरोडे या चार पोलिस कर्मचाऱ्यांची नावे घेत त्यांना निलंबित न करता सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली. तसेच श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक बरखास्त करण्याचीही मागणी त्यांनी केली.

Shrirampur Police Inquiry
Shrirampur Crime : "मला हत्यार द्या, मीच एन्काउंटर करतो..."; आकाश दुबय्याच्या वडिलांचा आक्रोश, बेग गँगवर गंभीर आरोप

आमदार ओगलेंच्या दाव्यामुळे खळबळ

आमदार ओगले यांनी मोर्चाला संबोधित करताना, नागरिकांकडून गुन्हेगारांच्या त्रासाबाबत अनेक निवेदने मिळाल्याचा दावा केला. या तक्रारींवर पोलिसांनी अपेक्षित दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Shrirampur Police Inquiry
Beg Gang Police Action : आकाश दुबय्या हत्येनंतर 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये पोलिस; 'बेग टोळी'च्या अड्ड्यावर छापा, गावठी पिस्तूल जप्त

एक कर्मचारी निलंबित

दरम्यान, सराईत गुन्हेगाराशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिस कर्मचारी शंकर चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केला.

चौकशीच्या निष्कर्षाकडे लक्ष

या प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर तक्रारी प्राप्त झालेल्या 17 कर्मचाऱ्यांपैकी 12 जणांची चौकशी सुरू असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यामुळे श्रीरामपूर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून चौकशीच्या निष्कर्षाकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com