Nashik MVP Annual Meeting  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MVP Annual Meeting : 'त्या' फोटोबद्दल सुनिल ढिकलेंचा खुलासा, नितीन ठाकरेंचे आरोप फेटाळले..

Nashik MVP Annual Meeting : मविप्र वार्षिक सर्वसाधरण सभेवेळी विद्यापीठ स्थापनेच्या विषायावर गोंधळ झाला. वार्षिक सभेनंतरही दावे-प्रतिदाव्यांमुळे व आरोपांमुळे वातावरण ढवळून निघालं आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : मविप्र संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी (दि. 14) अभूतपूर्व असा गोंधळ बघायला मिळाला. मविप्र विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावावरुन सत्ताधारी व विरोधक दोन्ही गट एकमेकांच्या आमने-सामने आले. या दरम्यान सभेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव नामंजूर केल्याची घोषणा केली. तर, प्रतिसभा घेत विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव मंजूर झाल्याचा दावा सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे मविप्र विद्यापीठ स्थापनेबाबत सभासदांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे. असे असताना सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी अध्यक्ष सुनिल ढिकले यांना एका फोटोवरुन टार्गेट केलं आहे. त्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

अध्यक्ष सुनिल ढिकले हे सभास्थळी असलेल्या पोडीयम वरती उभे राहून बोलत असतानाचा एक फोटो अॅड नितीन ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्या मराठा समाजाला आपण प्रगत समाज समजतो, त्या समाजाच्या मीटिंगमध्ये म्हणजेच वार्षिक सभेमध्ये गुंडगिरीचा प्रघात अध्यक्ष सुनील ढिकले व त्यांना चिथावणी देणाऱ्या माजी सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार व त्याच्या कुटुंबातील सगळ्याच घटकांनी व त्यांना मदत करणारी सर्व त्यांचे कार्यकर्ते निर्माण केला. संस्थेचे विद्यमान अध्यक्षच म्हणजेच डॉ. ढिकले व्यासपीठावरील पोडीयम वरती वर उभे राहून आपल्या गुंडगिरीचं प्रदर्शन करत होते असा आरोप करत अॅड. नितीन ठाकरेंनी त्या फोटोबद्दल लिहलं आहे.

मराठा समाज बांधवांनो हा फोटो बघा आणि आपण कुठे चाललो आहोत याचा बोध घ्या. आज मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेची वार्षिक सभा संपन्न झाली. या सभेतील सर्वात महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे संस्थेचे स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ निर्मिती बाबत ! सर्व इतर सर्व विषय मंजूर झाल्यानंतर विद्यापीठ या विषयावरती सरचिटणीस आणि सभासदांना खुद्द अध्यक्ष यांनीच बोलू दिले नाही. तरीही जाणकार सभासदांनी विद्यापीठ निर्मितीचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर केला. त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचं वर्तन होतं ते अत्यंत लाजिरवाणे होते असं नितीन ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सुनिल ढिकलेंनी केला खुलासा...

दरम्यान नितीन ठाकरे यांच्या या आरोपांवर अध्यक्ष सुनिल ढिकलेंनी खुलासा केला आहे. विरोधक या फोटोचे भांडवल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले सभा संपल्यानंतर काही सभासद नसलेलं लोक मीटींगमध्ये घुसले. त्यांनी मीटींगमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यातील काहींनी अॅड. नितीन ठाकरेंना उचलून घोषणा द्यायला सुरुवात केली. या गोंधळात मी लोकांना समजावत होतो की असं काही करु नका. त्याचवेळी काही लोकांनी पाठीमागून मला उचललं आणि डायरेक्ट त्या पोडियमवर नेवून ठेवलं. आता मला पाठिमागून कुणी उचललं आणि का उचललं हे मला माहिती नाही. उचलून डायरेक्ट पोडीयमवर ठेवलं. त्यानंतर माझ्या लक्षात आल्याबरोबर मी ताबडतोब खाली उतरलो पण त्याच्या आत तो फोटो आला. आता त्या फोटोचे हे लोक भांडवल करत आहे. परंतु सभा संपली आहे, त्यामुळे मी सगळ्यांना हातवर करुन सांगत होतो की तुम्ही गोंधळ घालू नका असा खुलासा अध्यक्ष सुनिल ढिकले यांनी सरकारनामा'शी बोलताना केला आहे.

पिस्तोल लावून उभ्या व्यक्तीवर आक्षेप

दरम्यान नितीन ठाकरे यांनी आणखी एका व्यक्तीचा फोटो पोस्ट करत त्यावर आक्षेप घेतला आहे. सभेप्रसंगी पिस्तोल लावून उभ्या व्यक्तीवर नितीन ठाकरेंनी आक्षेप घेतला. मविप्र सर्वसाधारण सभेतील व्यासपीठावरचा सर्वात मोठा कहर म्हणजे या मीटिंगमध्ये अध्यक्षांच्या शेजारी उभे असलेला व्यक्ती अक्षरशः पिस्तोल घेऊन अध्यक्षांच्या शेजारी उभा राहून दहशत पसरवीत होता जर काही विपरीत झालं असतं तर...असा सवाल त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT