Dhananjay Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhananjay Munde Statement : 'शपथविधी षडयंत्र' या मुंडेंच्या दाव्याचे पडसाद; तटकरेंकडून सावरासावरी, तर पाटील म्हणाले, 'समजून घ्या!'

NCP Shirdi Navsankalpa Shibir : शिर्डीतील नवसंकल्प शिबिरात 'सकाळ'च्या शपथविधीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या दाव्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत उमटायला सुरुवात.

Pradeep Pendhare

Shirdi NCP Shibir News : मंत्री धनंजय मुंडे यांनी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 'सकाळ'च्या शपथविधीवर केलेल्या दाव्याचे पडसाद सर्वप्रथम अजितदादांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमटायला सुरवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे विधान सावरून घेताना त्यावेळेस त्यांना तसे वाटत होते, अशी ती प्रतिक्रिया दिली आहे. तर पक्षातील माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी अजितदादा विरोधात षडयंत्र करणारे हे तिकडे आहेत, आम्ही अजित दादांबरोबर आहोत, आता तिकडं कोण आहेत हे समजून घ्या, असा टोला लगावला.

अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा त्यावेळचा सकाळचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता, असा दावा मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवसंकल्प शिबिराच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रात केला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. त्याचे सर्वप्रथम पडसाद अजितदादांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या मंत्री मुंडे यांच्या दाव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

'माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी मंत्री मुंडे यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना षडयंत्र झाले असेल, आम्ही आता अजितदादांबरोबर(Ajit Pawar) आहोत. ज्यांनी कोणी हे षडयंत्र रचले असेल, ते तिकडे आहेत. तिकडे म्हणजे कोणाकडे ते समजून घ्या', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल पाटील(Anil Patil) यांच्या या प्रतिक्रियेनंतर प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री मुंडे यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सावरासावरी केल्याचे दिसले. ते म्हणाले, "मंत्री मुंडे यांच्या दाव्याचा रोख, त्यावेळेस त्यांना जे वाटले त्यांनी ते आज व्यक्त केला, असा आहे".

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मास्टरमाइंडचा शोध लागणार -

मंत्री मुंडे यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणात होत असलेले, आरोप म्हणजे, मीडिया ट्रायल आहेत. यावर तटकरे यांनी बीड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वच्छ भूमिका घेतलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी या हत्येच्या तपासासाठी तीन यंत्रणा लावल्या आहेत. तपास खोलवर होऊन त्यातील मास्टरमाइंड याचा शोध घ्यावा, आरोपींना कडक शासन व्हावे सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT