Ajit Pawar, NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar politics: अजित पवारही जागे झाले, विधानसभेच्या तयारीसाठी काढली सन्मान यात्रा!

Sunil Tatkare politics, NCP Ajit Pawar friction active, today will take review for assembly-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाल्यानंतर 'राष्ट्रवादी' मध्ये सुरू झाल्या हालचाली

Sampat Devgire

Sunil Tatkare News: विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्ष नाशिकमध्ये सक्रिय झाले आहेत. विविध पक्षांचे मेळावे होत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटही जागा झाला आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष सर्वाधिक सक्रिय आहेत. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका घेतल्या आहेत. त्यात जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात मात्र गोंधळाची स्थिती होती. मात्र आता या पक्षाचे नेते देखील खडबडून जागे झाले आहेत.

पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज नाशिकला दाखल झाली. आज दिवसभर श्री तटकरे मतदारसंघ निहाय राजकीय आढावा घेणार आहेत. याद्वारे मरगळलेल्या पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेला सक्रिय करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, ;नितीन पवार, सरोज अहिरे आणिl दिलीप बनकर हे सहा आमदार आहेत. यातील काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याच्या बातम्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे जिल्ह्यातील नेतृत्व कोणाकडे? हा देखील एक वाद होता. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक यंत्रणा कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नव्हती. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सगळेच गोंधळलेले असल्याचे चित्र आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात महाविकास आघाडीचे तीनही खासदार विजयी झाले. या खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात भरघोस आघाडी मिळाली आहे. त्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजपचे नेते अजित पवार गटाविषयी नाराज आहेत. याबाबतच्या तक्रारी यापूर्वीच वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आल्या आहेत. त्याचे परिणाम भाजपने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असा आग्रह धरण्यात आला आहे.

महायुती विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाईल. मात्र लोकसभा निवडणुकीत कोणाला किती मतदान झाले. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत. त्याची झळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे आज नाशिक शहर, सिन्नर, निफाड आणि जिल्ह्याच्या अन्य मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. त्यात पदाधिकारी काय भूमिका घेतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT