Swabhimani Shetkari Sanghatna News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News : कांदा निर्यातीवर 40 टक्के कर ! 'स्वाभिमानी' संतापली...रविवारी राहुरीत तीव्र आंदोलन...

Farmers News : केंद्र सरकारच्या या निर्णयाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Swabhimani Shetkari Sanghatna News : अतिरिक्त कांदा उत्पादन आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकरी पिचलेला असताना गेल्या आठवड्यात कांद्याचे भाव तुलनेने वधारल्याने आनंदित झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या कांद्यावर लावलेल्या निर्णयात कर (एक्स्पोर्ट ड्युटी) मुळे चिंतेत भर पडली आहे. केंद्र सरकारने आज (19 ऑगस्ट) एक अध्यादेश जारी करत कांद्यावरील निर्यात कर थेट 40 टक्के लावला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatna) निषेध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

याबाबत नगर जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी 'सरकारनामा'ला केंद्र सरकारच्या (Central Government) शेतकरी विरोधी भूमिके बद्दल माहिती देताना 40 टक्के निर्यात कर लावल्याच्या निषेधार्थ उद्या (20 ऑगस्ट) राहुरी कृषी बाजर समिती आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

एकीकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासकीय घोषित मदत शेतकऱ्यांना मिळाली नसताना दुसरीकडे नगर जिल्ह्यासह कांदा लागवड पट्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया जात मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या परस्थितीत बांग्लादेश आदी विदेशातून आपल्या कांद्याला मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांत कांद्याचे क्विंटलचे दर 2500 रुपयांपर्यंत गेल्याने अडचणीतल्या शेतकऱ्याला मदतीचा थोडा हात मिळत होता. मात्र, केंद्र सरकारने शनिवारी (19 ऑगस्ट) एक अध्यादेश जारी करून कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात कर लावल्याने कांद्याचे भाव पुन्हा पडणार असून त्याचा फटका कांदा उत्पादक शतकर्यांना बसणार असल्याचा संताप मोरे यांनी व्यक्त केला.

सध्या बांग्लादेश मधून आपल्या कांद्याला मागणी वाढली होती. मात्र आता 40 टक्के निर्यात कर असल्याने वाढलेल्या भावामुळे विदेशी निर्यात कमी होणार असून त्याचा परिणाम देशांतर्गत कांद्याचे भाव पुन्हा खाली येण्यावर होणार असल्याने केंद्र सरकारच्या शहरी धार्जिणे आणि शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वत्र करणार असून उद्या राहुरीमधे पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जाणार असल्याची माहिती रविंद्र मोरे यांनी दिली.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT