Protest at Yeola Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yeola Maratha News : भुजबळांच्या मतदारसंघात मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी!

Symbolic burning of effigies of the state government by aggressive villagers-येवल्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक ग्रामस्थांकडून सरकारच्या प्रतीकात्मक तिरडीचे दहन

Sampat Devgire

Maratha news: केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात मराठा आरक्षणाचा विषय गंभीर बनला आहे. ग्रामस्थ आक्रमक झाल्याने त्यांनी थेट राजकीय नेत्यांना गावबंदीचा ठराव केला. (Maratha community aggressive on reservation issue in Yeola)

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यात (Yeola) सध्या मराठा (Maratha) आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाने उचल घेतली आहे. येथे राज्य सरकारचा (Maharashtra) निषेध करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू असूनही राज्य सरकार दखल घेत नाही, तसेच काहीजण आरक्षणाच्या मागणीवर विरोधाचे भाष्य करीत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या सोमठाण देश येथील सकल मराठा समाजाने आक्रमक होऊन बुधवारी मोर्चा काढून राज्य सरकारच्या प्रतीकात्मक तिरडीचे दहन केले.

संतप्त ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे १६ दिवसांपासून मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असताना, काही नेते आरक्षणाला विरोध दर्शवित आहेत, तर राज्य सरकारही ठोस दखल घेत नसल्याने येथे बुधवारी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

येथे जमलेल्या समाजबांधवांनी प्रारंभिक जोरदार घोषणाबाजी करत सुमारे २० मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर लासलगाव-येवला रास्ता रोको करत मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये सरकारची प्रतीकात्मक तिरडी काढण्यात आली. टाळमृदंग वाजवत भजन, कीर्तन म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

सोमठाण देश गावात केदारनाथ नवले, गोरख कदम, वसंत घनगाव, भाऊसाहेब कदम, दिगंबर कदम, नवनाथ घनगाव, संभाजी कदम, रंगनाथ ढगे, बाळकृष्ण घनगाव, आनंदा घनगाव, भानुदास घनगाव, अभिषेक कदम, पुंडलिक कदम, सुयश कदम, विठ्ठल पिंपळे, अंबादास कदम, गोरख कुंदे आदींसह शेकडो समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT