Manoj Jarange Protest : मुख्यमंत्री शिंदे हेच 'मराठा आरक्षण' देऊ शकतात; उपोषण सोडत जरांगेंनी व्यक्त केला विश्वास !

Manoj Jarange Patil Maratha Aarakshan Speech : "तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही..."
Manoj Jarange Patil Maratha Aarakshan Speech :
Manoj Jarange Patil Maratha Aarakshan Speech :Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News : मराठा आरक्षणाच्या मागणीवर मागील सोळा दिवसांपासून ठाम असलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. उपोषण सोडवण्यात मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. जरांगे यांनी या वेळी मराठा आरक्षणासाठी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मु्ख्यमंत्री शिंदे हेच मराठा आरक्षण देऊ शकतात, असे जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil Maratha Aarakshan Speech :
Eknath Shinde - Jarange Patil : मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी 'प्लॅन' बदलला ? जरागेंची भेट घेण्यासाठी आता शिंदे नाही, तर...

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. या वेळी जरांगे म्हणाले,"मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी स्वत:हून लक्ष घातलं, यामुळे मराठा समाजाच्या वतीने त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मराठा आरक्षण आणि मराठ्यांना न्याय मुख्यमंत्री शिंदेच देऊ शकतात. मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन, त्याशिवाय मागे हटणार नाही. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांविषयी आशा आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर धाडसी निर्णय तेच घेऊ शकतात, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता मुख्यमंत्र्यांमध्येच आहे."

Manoj Jarange Patil Maratha Aarakshan Speech :
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

"आपल्याला आता एक वेळ विश्वास ठेवायचा आहे आणि शांततेत आंदोलन करायचं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की, तेच मराठा समाजाला न्याय देऊ शकतात. मीही आता भाराहून न जाता मराठा समाजाप्रती प्रामाणिक राहून शिंदे साहेबांच्या मागे लागून आरक्षण घेणार आहे. तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सरकारने सांगितलं की एक महिन्याचा वेळ द्या. त्यानुसार एकमतानं जेव्हा समाजानं सांगितलं की, सरकारला एक महिना वेळ द्या आणि उपोषण मागे घ्या, त्यानुसार आता उपोषण मागे घेतलं आहे," असे जरांगे पाटील म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com