ACB officials arrested Talathi Pappu Kashinath Sonkamble in Nashik’s Jamkhed area during a bribery trap operation. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik ACB Trap : शेतकऱ्याला छळणारा तलाठी जाळ्यात, लाच घेताना रंगेहात पकडले; रस्त्यावर धाय मोकलून रडला, पैसे फेकले अन्...

Nashik Crime Talathi Pappu Sonkamble Arrested : सातबारा उताऱ्यावरील बहिणीचे नाव कमी करण्यासाठी तलाठ्याने शेतकऱ्याला महिनाभर छळले. अखेर त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने या तलाठ्याला धडा शिकवला. त्यातून मोठा नाट्यमय प्रसंग घडला.

Sampat Devgire

Nashik News : नाशिकमधील खामखेडा (देवळा) येथील शेतकऱ्याने आपल्या बहिणीचे हक्कसोड पत्र केले होते. त्यानुसार सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी अर्ज केला. मात्र तलाठ्याने शेतकऱ्याला छळण्यासाठी बहिणीसह त्याचेही नाव कमी केल्याने मोठा नाट्यमय प्रसंग घडला.

सातबारा उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी संबंधित शेतकरी तलाठी पप्पू काशिनाथ सोनकांबळे यांच्याकडे पाठपुरावा करीत होता. मात्र तलाठी महिनाभर त्याला काहीही प्रतिसाद न देता गप्प बसून होता. अंतर त्याने मध्यस्थ प्रशांत दावल सोनवणे यांच्यामार्फत पाच हजार रुपयांची मागणी केली.

आधीच तलाठ्याच्या त्रासाने बेजार झालेल्या शेतकऱ्याने पीक पाणी नसल्याने सातबारा दुरुस्तीचे वारंवार विनंती केली. मात्र तलाठी त्याला बधला नाही. अखेर त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने तलाठ्याला धडा शिकविण्याचा निर्धार केला. त्यानंतर मात्र एक हाय व्होल्टेज ड्रामा घडला.

शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रार प्राप्त झाल्यावर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तलाठ्याने आधीच एक हजार रुपये लाच स्वीकारली होती. उर्वरित पैसे स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला पुराव्यासह ताब्यात घेतले.

एसीबी पथकाचे कर्मचारी तलाठी आणि त्याच्या सहकार्याला शासकीय वाहनातून पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. यावेळी गेले महिनाभर शेतकऱ्याला त्रस्त करून सोडणारा तलाठी गयावया करीत रडू लागला. नंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी स्वीकारलेल्या लाचेचे पैसे गाडीतून बाहेर फेकून दिले.

दोघांना अटक

हा सर्व प्रकार आणि आरडाओरड पाहून परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. एसीबीचे एकनाथ पाटील यांनी यासंदर्भात देवळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तलाठी सोनकांबळे आणि त्याचा सहकारी प्रशांत सोनवणे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT