Vidhan Parishad Election: अखेर डाव साधलाच! विधान परिषदेच्या उमेदवार यादीमध्ये घुसवली 'या' मतदारांची नावे ?

Pune Vidhan Parishad News: पुणे विधान परिषद मतदारसंघात 69 नव्या मतदारांची भर पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता.
Vidhan Parishad Election News
Vidhan Parishad Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. अवघ्या आठ मतांनी या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे पारडं भाजप पेक्षा जड आहे. आता जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीमुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात समीकरणे बदलली आहेत. अपेक्षित नसलेली नावं देखील या यादीत असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी निवडणुकांसाठी निवडणूक विभागाने ही प्रारूप मतदार यादी जाहीर केली. त्यावर हरकती आणि सूचना २७मेपर्यंत घेतल्या जातील. विधान परिषदेच्या या जागेसठी २५ मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असून, १८ जून रोजी मतदान होणार आहे.

Vidhan Parishad Election News
Zilla Parishad News: सदस्यांना गुलाल लागून तीन महिने झाले तरी रस्त्यांना डांबर लागेना! विकासनिधींना मुहूर्त मिळेना

जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण ८६७ मतदार आहेत. यामध्ये ५६ स्वीकृत नगरसेवक आणि पंचायत समिती यांच्या १३ सभापतींचा मतदार यादीत समावेश असून, त्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला नव्हता. या निवडणुकीत स्वीकृत्यांना मतदानाचा अधिकार देऊन काही डाव आखला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Vidhan Parishad Election News
Kulfi Seller’s Three Daughters Become Police: आई शेतमजूर, वडील कुल्फी विक्रेते; तीनही लेकी बनल्या पोलीस

पुणे महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समितांमध्ये स्वीकृत सदस्य नेमले गेले आहेत. अशा ५६ स्वीकृत सदस्यांनादेखील विधान परिषद निवडणुकीत मतदान करता येणार आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्य नियुक्त केले गेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही संस्थांमध्ये निर्वाचित सदस्य हेच मतदान करतील. जिल्हा परिषदेशी संबंधित जिल्ह्यातील १३ पंचायत समितीचे १३ सभापती हे देखील या निवडणुकीसाठी मतदार आहेत. पुणे, खडकी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांना देखील मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे.

Vidhan Parishad Election News
Pune Police News: जो गुन्हा केलाच नाही, त्यात शरद पवारांच्या नेत्याला अटक! पुणे पोलिसांच्या कारभारावर सवाल

प्रारूप मतदार यादी जिल्हा परिषद पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक १७, नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ तसेच नावातील तपशील दुरुस्तीसाठी फॉर्म क्रमांक ८ भरून मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे २७ मेपूर्वी सादर करता येईल.

Vidhan Parishad Election News
Sunil Shelke News: सुनील शेळकेंना मिळणार ‘लाल दिवा’; कोणते खाते मिळणार?

या बदललेल्या गणितांमुळे सध्या राष्ट्रवादीच्या मतांमध्ये मतांमध्ये 25 ने वाढ झाली आहे. तर भाजपाच्या मतांमध्ये 24 ने वाढ झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच काहीसा मतदानाच्या आकड्यात पुढे असल्याचे पाहायला मिळतंय. या अटीटटीच्या लढतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुण्यात भाव खाऊन जात असल्याचे चित्र पाहायला मिळते कारण शिंदेंकडे असलेली सत्तर मतं ही निर्णायक ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com