Jalgaon Bribery Case : लाचखोर उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सोन्याची बिस्कीटे, हार, बांगड्या अन् ; कोट्यावधींचे घबाड पाहून ACB चे पथक थक्क

Jalgaon Bribery Case : तक्रारदारासह त्याच्या पत्नीवर दाखल असलेल्या सावकारी गुन्ह्यात अनुकूल अहवाल देण्याच्या बदल्यात उपनिबंधकाने तब्बल पाच लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
Crime of Bribery
Crime of BriberySarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Bribe Case : तक्रारदारांवर दाखल असलेल्या सावकारी गुन्ह्यात अनुकूल अहवाल देण्यासाठी तीन लाखांची लाच घेणाऱ्या सहकारी संस्था जळगाव तालुका उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी याच्या बँक लॉकरमध्ये एसीबीला तब्बल १ कोटी ७ लाख रुपयांचे घबाड सापडले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केलेले उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी याच्या लॉकरमधून १ कोटी ७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

अवैध सावकारीच्या कारवाईत तक्रारदारासह त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अनुकूल अहवाल देण्याच्या बदल्यात उपनिबंधक जगदीश बारी यांना २० मे रोजी दीड लाखांची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

Crime of Bribery
Tarapur Bribe Case: व्यावसायासाठी तरुणानं ग्रामपंचायतीकडं मागितली 'NOC'; महिला सरपंचानं घेतली लाच; पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

एसीबीने बारी यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या कॉसमॉस बँकेच्या भुसावळ शाखेत लॉकर असल्याची माहिती एसीबीला मिळाली. त्यावरून दोन पंचांच्या उपस्थितीत लॉकरची झडती घेतली. त्यात ६६०.३३० ग्रॅमच्या सोन्याचे हार, बांगड्या आणि सोन्याचे बिस्किटे असा ९९ लाख चार हजार ९६० रुपयांचा ऐवज मिळाला. आठ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोकड आणि दोन हजार ६२५ रुपयांचे चांदीचे दागिनेही आढळले. असा एकूण एक कोटी सात लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उपनिबंधक बारी यांनी तक्रारदाराकडे अवैध सावकारीच्या अनुषंगाने 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. नंतर तडजोडीअंती ३ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच पडताळणीदरम्यान उपनिबंधक बारी यांनी मागील प्रकरणावेळी वकील लावला म्हणून आमचे मोठे नुकसान झाल्याचे सांगून नकारात्मक अहवाल दिल्याचे तक्रारदाराला सांगितले.

मात्र आता अनुकूल अहवाल पाठवतो, असे सांगून तीन लाख रुपये लाचेच्या रकमेपैकी पहिला दीड लाख रुपयांचा हप्ता खासगी इसम देविदास पाटील याच्याकडे २० मे रोजी देण्यास सांगितले. त्यानुसार सापळा कारवाईत उपनिबंधक जगदीश बारी यांच्या मागणीप्रमाणे खासगी इसम पाटील याला दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. (jalgaon News)

Crime of Bribery
Jalgaon Bribery Case : 80 लाखांच्या बिलासाठी 18 लाखांची डिमांड ; PWD च्या अभियंत्याला नगरसेविकेसाठी हवी होती सहा टक्के अतिरिक्त लाच

ही झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार संगीता पवार, प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सूर्यवंशी आणि चंद्रशेखर चौधरी यांनी कारवाईत भाग घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com