Sudhakar Badgujar and Hemant Godse Sarkarama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT News : 'ठाकरेंशी गद्दारी केल्याने गोडसेंवर वणवण भटकण्याची वेळ'; सुधाकर बडगुजर यांचा टोला!

Sampat Devgire

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारा निश्चितीवरून बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. बहुतांश जागांवर उमेदवार निश्चिती झाली आहे, तर अद्यापही काही जागांचा तिढा कायम आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात(Nashik Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाला आहे, तर महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चिती करण्यात आलेली नाही. कारण, महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकीतून ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसेंवर टीका केली आहे.

ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आज नाशिक शहरात मतदारांच्या गाठीभेटींना सुरुवात केली. या वेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. या बैठकीत एकमताने प्रचार करून वाजे यांना यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इंडिया आघाडीमध्ये एकोपा आहे. या उलट आमचे विरोधक मतदारसंघ कोणाला द्यावा आणि उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप एकमत करू शकलेली नाही. त्यामुळे त्यांच्यात मोठा गोंधळ आहे. हे लोक निवडणुकीला कसे सामोरे जातील असा प्रश्न केला.

या वेळी बडगुजर यांनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे(Hemant Godse) यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, शिवसेनेने गोडसे यांना दोन वेळा खासदार केले. मात्र, त्यांना त्याची जाणीव राहिली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी गद्दारी केली. या गद्दारीची फळे त्यांना चाखायला मिळत आहेत.

उमेदवारीसाठी त्यांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ज्यांच्यासाठी गद्दारी केली, त्यांनीच त्यांची उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न केले. हा काळाने उगवलेला सूड आहे, असे सांगितले.

या वेळी उमेदवार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(Sharad Pawar) गटाचे नेते श्रीराम शेटे, कोंडाजी मामा आव्हाड, ठाकरे गटाचे विलास शिंदे, दत्ता गायकवाड, संपर्क नेते जयंत दिंडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश छाजेड, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी आमदार नितीन भोसले, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ॲड. भगीरथ शिंदे, डॉ हेमलता पाटील आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT