Uddhav Thackrey & Adv. Prakash Ambedkar
Uddhav Thackrey & Adv. Prakash Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News; ठाकरे सेना- वंचित युतीचा पहिला प्रयोग महापालिकेसाठी

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) राज्याच्या (Maharashtra) राजकारणात उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackrey) शिवसेना (Shivsena) व वंचित बहुजन आघाडीत (Vanchit Bahujan Front) युतीचा निर्णय निश्चित झाल्याच्या अनुषंगाने नाशिक महापालिका (NMC) निवडणुकीसंदर्भात गुरुवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची शासकीय विश्रामगृह प्राथमिक चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणुकीत शिवशक्ती व भीमशक्तीला यश मिळेल, असा दावा करण्यात आला. (Shivsena & Vanchit Front alliance for NMC election is in progress)

नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने गेले वर्षभर जोरदार तयारी केली आहे. शिंदे गटाने प्रयत्न करूनही शिवसेना मजबुत असल्याचा संदेश स्थानिक नेते देत आहे. या पार्श्वभूमीवर भिमशक्ती, शिवशक्तीचा प्रयोग साकारला जाणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट व वंचित बहुजन आघाडी युतीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने नाशिकमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उपनेते सुनील बागूल यांच्यासह संपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगरप्रमुख अविनाश शिंदे, संजय साबळे, बाळासाहेब शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काय तयारी करता येईल, याचा आढावा घेताना शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहजपणे जिंकता येणे शक्य असल्याचे मत मांडण्यात आले.

पुढील चर्चा जागा वाटपाची

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप संभ्रम असला तरी आतापासूनच तयारी करण्याचा भाग म्हणून जागा वाटप निश्चित केले जाणार आहे. पुढील बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार असून, जागांची संख्या व निश्चित प्रभाग या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT