Sharad Koli & Gulabrao Patil
Sharad Koli & Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शरद कोळींचे गुलाबराव पाटील यांना थेट आव्हान

Sampat Devgire

एरंडोल : महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने ठाकरे गटाचे (Uddhav Thackrey) नेते शरद कोळी (Sharad Koli) चर्चेत आले. शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि त्यांच्यात चांगलाच राजकीय वाद रंगला. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने बेपत्ता असलेल्या कोळी यांनी काल पोलिसांत (Police) हमीपत्र सादर केले. त्यानंतर त्यांनी गुलाबराव पाटील यांना थेट आव्हान दिले. (Sharad koli may increase problems for Gulabrao patil)

आगामी २०२४ ची विधानसभा निवडणूक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात त्यांच्याच मतदारसंघात लढवून त्यांना पराभूत करू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी केली.

धरणगावला महाप्रबोधन यात्रेनिमित्त सुषमा अंधारे यांच्या झालेल्या सभेत शरद कोळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केल्यावरून मंत्री पाटील व गुजर समाजाच्या भावना दुखावल्या, म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने शरद कोळी अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

या जामिनाच्या कागदपत्रांशी संबंधित कामासंदर्भात त्यांनी शनिवारी धरणगावला येऊन २५ हजारांचा जातमुचलका पोलिसांना सादर केला व पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी पत्रकारांशी बोलताना श्री. कोळी म्हणाले, की मी भाषणात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. मात्र, ज्यांना राजकारण करायचे आहे. त्यांनी ते घडवून आणले आहे.

कायद्याच्या चाकोरीत राहूनच भाषण केले होते. शिवसैनिक कायदा मानणारे आहेत. मंत्र्यांनी दबाव आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यात सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला होता. त्यानुसार, शनिवारी त्याच कामासाठी आपण आलो होतो. जळगाव जिल्ह्यातील दादागिरी मोडून काढू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, शरद कोळी यांचे धरणगावला कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT