Maratha reservation issue : मराठा समाजाल आरक्षण आणि दुष्काळाच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांमी समक्ष येऊन आश्वासन व कार्यवाहीचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी पांगरी (ता. सिन्नर) येथी उपोषणकर्ते ठाम राहिले आहेत. (Villagers refused to withdraw strike without Guardian Minister Dada Bhuse)
पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार मराठा समाज (Maratha) व ग्रामस्थांनी (Nashik)जाहीर केला आहे.
पांगरी (सिन्नर) येथी ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाचा प्रश्न आता चिघळण्याची स्थिती आहे. मराठा आरक्षण मागणीच्या पूर्ततेसह सिन्नर तालुक्यात तातडीने दुष्काळी सवलती लागू कराव्यात, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी साखळी उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांनी जोपर्यंत पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्णय घेतला घेतला आहे.
छावा संघटनेच्या माध्यमातून गेल्या दोन आठवड्यांपासून पांगरी येथे संत हरीबाबा मंदिरात ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. यातच शासकीय स्तरावरून दाद मिळत नसल्याने दोन दिवसांपासून काही ग्रामस्थ थेट आमरण उपोषणास बसले आहेत.
उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, सिन्नर तहसीलदार सुरेंद्र देशमुख, वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांनी शनिवारी (ता.२३) दुपारी उपोषण स्थळी येत ग्रामस्थांची मनधरणी करत ग्रामस्थांच्या मागणीनुसार पांगरी गावासाठी तीन टँकर तातडीने मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात टंचाईची परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असताना स्थानिक प्रशासकीय यंत्रणा मात्र अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याचा आरोप विलास पांगारकर यांच्यासह उपोषणकर्त्यांनी केला.
तसेच पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी समक्ष येऊन आंदोलकांशी चर्चा करावी व जागेवर निर्णय घेऊन दुष्काळी उपाययोजनांबाबत अंमलबजावणी करावी. तसे लेखी आश्वासन देखील द्यावे, असा आग्रह यावेळी उपोषणकर्ते यांनी करत उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका घेतली. अखेर आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने शिष्टाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.