Raju Shetty, Manikrao Kokate & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raju Shetty Politics: राजू शेट्टींचा अजित पवारांना चिमटा, कोकाटे यांनी आपले नव्हे, आपल्या नेत्याचे अपयश बोलून दाखवले'

The government has abandoned the farmers, the Agriculture Minister and Ajit Pawar have completely failed -कृषी खात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हटल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषिमंत्र्यांना झापले

Sampat Devgire

Raju Shetty News: कृषिमंत्र्यांकडूनच आपल्या खात्याचे वाभाडे काढण्यात आले आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांना आणि शेतीलाच नव्हे तर कृषी खात्यालाही सरकारला योग्य सन्मान न देता त्यांची हेटाळणी राज्य सरकारकडून होत आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी खाते हे ओसाडगावची पाटीलकी असल्याचे म्हटले आहे. कृषिमंत्री कोकाटे यांनी हे आपले नव्हे तर आपल्या नेत्याचे अपयश बोलून दाखवले आहे. खात्याला योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा नसेल तर ते देण्याचे काम त्यांच्या नेत्याचे अर्थात अजित पवार यांचे आहे. त्यात ते अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल, असे राजू शेट्टी म्हणाले.

नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने नेहमीच्या पावसापेक्षा शेतीचे मोठे नुकसान केले आहे. कांदा शेतात आणि घरात सडला आहे. आधीच त्याला भाव नव्हता. द्राक्ष बागांची फुले गळून पडली आहेत. कृषिमंत्री याच जिल्ह्याचे आहेत मात्र ते किती शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले हा गंभीर प्रश्न आहे, या शब्दात राजू शेट्टी यांनी सरकारला धारेवर धरले.

कृषी विभागाला त्यांचेच मंत्री ओसाड गावची पाटीलकी म्हणतात हे लाजिरवाणे आहे. कृषी खाते हे ओसाड गावची पाटीलकी असेल तर अर्थ खात्याच्या चाव्या कोणाकडे आहेत? असा प्रश्न शेट्टी यांनी केला. खात्याला प्रतिष्ठा आणि आधार देण्याचे काम त्यांचेच नेते का करीत नाहीत?. हा दोष कोणाचा असा प्रश्न शेट्टी यांनी केला.

महाराष्ट्रात सहा मे पासून सातत्याने तीन आठवडे मुसळधार पाऊस झाला. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष बागेत पाणी तुंबून राहिल्याने द्राक्षांची गर्भधारणा होणार नाही. डाळिंबाची फूल झडती झाली आहे. उन्हाळी कांदा खराब झाला आहे. भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. ही भरपाई देण्याची जबाबदारी कृषिमंत्र्याची नाही का?.

कृषिमंत्री शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देतात. शेतकरी प्रचंड संकटात असताना त्याला सावरण्याचे काम सरकारने करायचे असते. मात्र सरकार अत्यंत बेजबाबदारपणे काम करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात. सरकारच्या धोरणाचा हा परिपाक आहे.

जिल्हा बँकेला राज्य सरकारने मदत करणे अपेक्षित होते. जिल्हा बँकेला एक हजार कोटी रुपये मदत करण्याची आवश्यकता होती. मात्र सरकारने मदत न करता व्याज सवलत द्यायची घोषणा केली आहे. खऱ्या अर्थाने पाटील तिची भाषा ही आहे. अशी भाषा करणे ऐवजी बँकेला मदत केली असती तर स्थिती चांगली झाली असती असे शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांचे थोडे काही चांगले होण्याची स्थिती निर्माण झाली की काळे मांजर आडवे येते. प्रकारचे धोरण हेच काळे मांजर झाले आहे. केंद्रातले असो व राज्यातले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने सापतन वागणूक देत आले आहे. ही स्थिती बदललेली नाही तर सरकारला धडा शिकवावाच लागेल. काम आता शेतकरी आणि जनतेने केले पाहिजे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT