Uddhav Thackrey Politics: Breaking; मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलेले उपनेते सुधाकर बडगुजर म्हणतात, "मी शिवसेनेत नाराज"

Uddhav Thackrey: Will Shiv Sena deputy leader Sudhakar Badgujar leave Thackeray?- उपनेते बडगुजर यांच्यासह महानगर प्रमुख विलास शिंदे निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत?
Sudhakar Badgujar,Uddhav Thackrey & Vilas Shinde
Sudhakar Badgujar,Uddhav Thackrey & Vilas ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: शिवसेनेचे उपनेते आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर आज यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यांच्या विधानाने शिवसेना ठाकरे पक्ष सावध झाला आहे. उपनेते बडगुजर यांसह महानगरप्रमुख पक्ष सोडणार काय? याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भेटीने राजकीय चर्चांना उधान आले होते. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आणखी एक धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंना नाशिक शहरातून मोठा सेटबॅक बसण्याची शक्यता आहे.

उपनेते बडगुजर म्हणाले, माझ्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज आहे. सेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे देखील नाराज आहे. विशेष म्हणजे कालच बडगुजर मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विलास शिंदे यांच्या कुटुंबातील विवाहाला खास हजेरी लावून गेले.

Sudhakar Badgujar,Uddhav Thackrey & Vilas Shinde
Devendra fadnavis Politics: फडणवीसांच्या बाउन्सरने अजित पवार, एकनाथ शिंदेंचे स्वप्न भंगले?

त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का देण्यात यशस्वी झाले, असे म्हणता येईल. विशेष म्हणजे श्री. बडगुजर यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतरच बडगुजर आणि शिंदे हे दोघेही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या बाहेर आल्या होत्या. त्यावेळी मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत देखील श्री. बडगुजर यांना पाचारण करण्यात आले नव्हते.

Sudhakar Badgujar,Uddhav Thackrey & Vilas Shinde
Kirit Somaiya Politics: किरीट सोमय्या यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संबंध मालेगावशी जोडला, काय आहे प्रकरण?

ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनेते बडगुजर आणि महानगर प्रमुख विलास शिंदे हे दोघेही नाराज असल्याचा बातम्या बाहेर आल्या आहेत. बडगुजर यांनी आपण संपर्क नेते संजय राऊत यांच्यावर नाराज नाही. मात्र पक्षाच्या नियुक्ती करताना विश्वासात घेण्यात आले नाही. माझ्यासह दहा ते बारा जण त्यामुळे नाराज आहेत. मी नाराजी दूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात किती यश येईल हे सांगता येत नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कुटुंबाच्या विवाह समारंभाला लावलेली हजेरी राजकीय घडामोडींचे संकेत देणारी होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विलास शिंदे हे आमचे जुने कार्यकर्ते आहेत, असे सांगत त्यांना गोजारण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे उपनेते बडगुजर यांनी विलास शिंदे शिवसेनेत नाराज असल्याचे म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दोनदा उमेदवारी सह बडगुजर यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. मध्यंतरी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता. यामध्ये बडगुजर आणि त्यांचे चिरंजीव यांना जामीन घेण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागली होती. पार्श्वभूमीवर बडगुजर काय निर्णय घेतील हे लपून राहिलेले नाही. ठाकरे यांना नाशिक शहरात हा मोठा राजकीय धक्का मानला जातो.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com