Narhari Zirwal : मंत्री झिरवाळांचा नादच खुळा, रस्त्यावर ताफा थांबवून केली दाढी

Minister Narhari Zirwal seen shaving at a simple barbershop in Nanded during his visit : मंत्री नरहरी झिरवाळ नेहमीच त्यांचा साधेपणा व नादखुळा स्वभावामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एका कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Narhari Zirwal
Narhari Zirwal Sarkarnama
Published on
Updated on

Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवाळ नेहमीच त्यांचा साधेपणा व नादखुळा स्वभावामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एका कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. नांदेड दौऱ्या दरम्यान त्यांनी आपला ताफा रस्त्यालगत थांबवून साध्या सलूनमध्ये जाऊन त्यांनी दाढी केली. त्यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

नरहरी झिरवाळ हे महायुतीच्या मंत्रिमंडळात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत. मात्र मंत्रिपदाचा त्यांचा तसा कसलाही रुबाब नसतो. मंत्री झिरवाळ हे सोमवारी (दि. २) किनवट तालुक्यातील शेतकरी मेळावा आणि एका विवाह समारंभासाठी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी नांदेड जिल्हावासीयांनाही त्यांनी आपल्या साधेपणाचा परिचय दिला.

त्यांनी प्रवासादरम्यान अचानक आपला गाड्यांचा ताफा थांबवला. इस्लापूर गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका साध्या कटींगच्या दुकानात जात त्यांनी दाढी केली. येथे उपस्थित गावकऱ्यांसह सलून चालकाशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. मंत्री झिरवळ यांचा साधेपणा पाहून इस्लामपूरचे गावकरी थक्क झाले.

Narhari Zirwal
Uddhav Thackrey Politics: Breaking; मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलेले उपनेते सुधाकर बडगुजर म्हणतात, "मी शिवसेनेत नाराज"

मंत्री झिरवाळ ज्या कटिंगच्या दुकानात दाढी करायला थांबले ते दुकान अत्यंत छोटे व साधे होते. त्या दुकानात एसी नव्हता, अन्य कुठल्या सुविधाही नव्हत्या. तरीही एका सामन्य माणसाप्रमाणे एका सामन्य सलून चालकाकडून मंत्री झिरवाळ यांनी आनंदाने दाढी केली. त्याच्याशी गप्पा मारल्या, शिवाय दाढी करुन झाल्यावर त्याचे आभारही मानले.

मंत्री झिरवाळ यांच्या दौऱ्यात या ठिकाणी थांबण्याचे कुठलेही नियोजन नव्हते. पण अचानक झिरवाळ यांनी ताफा थांबवला आणि कटींगच्या दुकानात शिरले. मंत्री साहेब माझ्या दुकानात येतील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, असे सांगताना सलून चालकाच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता.

Narhari Zirwal
Uddhav Thackeray : लग्न सोहळ्याच्या आडून शिंदे-फडणवीसांनी सोडले बाण, उद्धव ठाकरे घायाळ

काही दिवसांपूर्वी मंत्री झिरवाळांचा असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. मंत्री झिरवाळ हे कामानिमित्त हेलिकॉप्टरने त्यांच्या मतदारसंघात गेले होते. त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्याच गर्दीत त्यांचा बालपणीचा मित्रही होता. झिरवाळ साहेबांनी त्याला हेलिकॉप्टर दाखवलं होतं. त्याच्या खाद्यांवर हात ठेवत त्याच्यासोबत संवाद साधत फोटोही काढला होता. मंत्री झिरवाळांचा हा साधेपणा अनेकांना भावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com