Nagar Politics News : एकीकडे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने राज्यभरातील वातावरण तापले आहे. त्यातच आता नगर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) आणि माध्यमिक शिक्षक संघाला विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. संगमनेर येथे सभा घेत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. टीडीएफच्या या सभेत आप्पासाहेब शिंदे (Appasageb Shinde) यांच्या उमेदवारीचा सूर आवळण्यात आला. विधानपरिषदेत शिक्षकांच्या हक्काचा आमदारासाठी एकजुटीचा यावेळी नारा देण्यात आला.
या सभेत शिक्षकांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचे दिसते. दिवसेंदिवस शिक्षकांवर शिक्षण बाह्य कामांचा सपाटा देण्याचा चालवले आहे. यामुळे विधानपरिषदेत शिक्षकांमधून हक्काचा माणूस गेलाच पाहिजे, असे नारा देण्यात आला. जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न, शालार्थ आयडी, शालाबाह्य कामे यावर शिक्षक नेत्यांची जोरदार भाषणे झाली. शिक्षण विभागात प्रलंबित कामासंदर्भात व दप्तर दिरंगाईबाबत या सभेत रोष व्यक्त करण्यात आला. याबाबत शिक्षक संघटनांनी (Teacher Assisition) एकत्र येत आंदोलन करण्याचा ठराव घेतला.
निवडणुका आणि जनगणना ही कामे राष्ट्रीय कर्तव्य असले, तरी या काळामध्ये निवडणुकीचे कामकाज करताना अनेक शिक्षकांना स्वतःच्या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यामध्ये आपले कर्तव्य बजावण्यासाठी जावे लागते. प्रशासनाने ज्या ठिकाणी आपण काम करतो तेथेच नेमणूक करण्याची मागणी शिक्षकांनी केली. तसेच 50 वयोगटातील शिक्षकांना या कामातून सूट द्यावी व महिलांची गैरसोय होऊ नये या संदर्भात देखील संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा ठराव या सभेत करण्यात आला.
फेडरेशनचे अध्यक्ष चांगदेव कडू यांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. टीडीएफचे अध्यक्ष एम. एस. लगड, सचिव मुस्ताक सय्यद, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, सचिव राजेंद्र खेडकर, विठ्ठलराव पानसरे, उमेश गुंजाळ, बाळकृष्ण चोपडे आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, टीडीएफने घेतलेल्या या ठरावाकडे इतर शिक्षक संघटना कसा प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागले आहे. नगर जिल्ह्यात शिक्षक संघटनांचे जाळे मोठे आहे. या संघटना लवकर एकत्र येत नाही. आल्या, तरी त्या जास्त काळ एकत्र राहत नाहीत. त्यामुळे टीडीएफकडून विधानपरिषद निवडणुकीची तयारी कितपत यशस्वी होते, हे येणारा काळाच सांगेल.
(Edited By : Sachin Waghmare)