Chhagan Bhujbal and Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांची शरद पवारांच्या भेटी मागील रहस्य समोर?

Chhagan Bhujbal and Sharad Pawar meeting secret : ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. राज्यातील आरक्षणाचा तिढा संपवण्याची विनंती त्यांनी पवारांना केली. मात्र, भुजबळांची या भेटीमागील आणखी एक रहस्य समोर येत आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यात ओबीसींचा किल्ला लढवणारे ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ एकाकी पडले असून, त्यांची प्रतिमा मराठा समाजात खलनायक, अशी झाली आहे. या प्रतिमेमुळे छगन भुजबळ यांना पुढची विधानसभा अवघड झाली आहे.

यातूनच त्यांनी ओबीसी-मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांची ही भेट राजकीय दूरदृष्टी ठेवून होती. त्यामागील रहस्य आता समोर येऊ लागले आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संघर्षाची तीव्रता वाढतेय. मनोज जरांगे 20 जुलैपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात आरक्षण बचाव रॅलीची घोषणा केली आहे. लक्ष्मण हाके यांनी सगेसोयरे अध्यादेशाला तीव्र विरोध असून, ते देखील आंदोलनाच्या तयारीत आहेत. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात आरक्षणावरून सतत रणकंदन दिसते. यातूनच छगन भुजबळ यांना त्यांची विधानसभा अवघड होता दिसू लागली आहे.

राज्यात ओबीसी-मराठा संघर्ष तीव्र झालेला दिसतो. हा संघर्ष विधानसभेला सत्ताधाऱ्यांना मारक ठरू शकतो. याचे सर्व खापर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर फुटू शकते. याशिवाय विधानसभा निवडणूक देखील छगन भुजबळांसाठी अवघड झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी छगन भुजबळ यांची आता धडपड चालू आहे. छगन भुजबळ यांची शरद पवार यांची घेतलेली भेट विधानसभा वाचवण्यासाठी असल्याचे समोर येत आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्रिमंडळात छगन भुजबळ एकाकी पडलेत. ओबीसी आरक्षणाची छगन भुजबळांनी राज्यात बाजू लावून धरली. छगन भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असले, तरी ते समाधानी नाहीत. छगन भुजबळ देखील इतर पक्षांकडे चाचपणी करत आहेत. परंतु मराठा समाजाचा रोष नको म्हणून भुजबळांबाबत इतर पक्ष देखील सावध भूमिकेत दिसतात.

छगन भुजबळ यांना देखील पुढची विधानसभा अवघड असल्याचे कल्पना आली आहे. यामुळे त्यांनी मध्यंतरी राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची पसंती दर्शवली होती. परंतु सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली. त्यामुळे एकाकी पडलेले भुजबळ पुढचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी मतदारांमुळे निवडणुका जिंकता येईल, असे नाही. हे छगन भुजबळ हेरून आहेत. शरद पवार यांची भेट त्यातूनच होती, असे सांगितले जाते. आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी छगन भुजबळांनी शरद पवार यांना गळ घातली. शरद पवार या विनंतीवर काय भूमिका घेतात, हे पाहण्यासारखे राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT