Shivaji Kardile, Sangram Jagatpa, Vaibhav Pichad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Governor Appointed MLC : वैभव पिचडांनी ठोकला मुंबईत तळ; तर शिवाजी कर्डिलेंसाठी जावईही रिंगणात

कर्जत-जामखेडमध्ये २०१९ मध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांना पराभूत केले. वरिष्ठ नेते असलेल्या राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेवर घेत ताकद दिली.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Nagar Politic's : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने आता अनेकांना विधान परिषद आमदारकीची स्वप्ने पडू लागली असण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातील अनेकांना आपली वर्णी विधान परिषदेवर लागावी, अशीच अपेक्षा असणार आहे. या तीनही पक्षांना १२ नावांची यादी राज्यपालांना देण्यापूर्वी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या अनुषंगाने विचार करावा लागणार आहे, हे मात्र निश्चित. (There are many aspirants from BJP for Legislative Council MLC)

नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) एकूण सहा आमदार २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. यातील नगर (संग्राम जगताप), पारनेर (नीलेश लंके), अकोले( किरण लहामटे), आणि कोपरगाव (आशुतोष काळे) हे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत गेले आहेत, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आणि राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांची साथ देणे पसंत केले आहे.

अजित पवार (Ajit Pawar) हे सोबत गेल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. पण, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोणाला कोणत्या जागा सोडायच्या अशा पेचात आता भारतीय जनता पक्ष असणार आहे. त्यामुळे पक्षातील कोणत्या इच्छुकांवर राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारकीचा 'उतारा' लागू करायचा, याच विचार वरिष्ठ पातळीवर नक्कीच सुरू असेल.

कर्जत-जामखेडमध्ये २०१९ मध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांना पराभूत केले. वरिष्ठ नेते असलेल्या राम शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेवर घेत ताकद दिली. आता त्याच पद्धतीने अकोल्यातून माजी आमदार वैभव पिचड (vaibhav Pichad), कोपरगावमधून माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि राहुरी मतदार संघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना विधान परिषदेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष ताकद देणार का, याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

अकोला तालुका हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहिला आहे आणि त्यामुळे या ठिकाणावरून वैभव पिचड यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष विधान परिषदेचे दरवाजे खुले करणार का? याबद्दल सध्या तालुक्यात आणि जिल्ह्यात चर्चा आहे. स्वतः वैभव पिचड यासाठी मुंबईत तळ ठोकून असल्याचं बोललं जातेय. त्याचबरोबर राहुरी मतदारसंघातून शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांच्यासाठीही मोठे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासाठी अजित पवारांसोबत गेलेले नगरचे आमदार आणि शिवाजी कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय.

कोपरगावमध्ये धक्कादायक निर्णय होणार?

कोपरगावमध्ये भविष्यात वेगळेच राजकीय चित्र दिसेल, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे किंवा त्यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी अद्यापही विधान परिषदेसाठी प्रयत्न केल्याची चर्चा दिसून येत नाही. त्यामुळे गणेश कारखाना निवडणुकीनंतर समोर आलेली गणिते, कोल्हे आणि थोरात यांची जवळीक आणि त्याचबरोबर आमदार आशुतोष काळे यांनी अजित पवार गटात जाणं यामुळे एकूणच या मतदारसंघात कोल्हे परिवार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काही धक्कादायक निर्णय घेतील, अशीही चर्चा नगर जिल्ह्यात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT