Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : राज्यात नोव्हेंबरनंतर महाविकास आघाडीचे सरकार; संजय राऊतांचा 'कॉन्फिडन्स'!

Sunil Balasaheb Dhumal

Nashik Political News : लोकसभेनंतर राज्यात विधानसभेच्या 11 जागांच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना पेन्शन देणार आहे, असे मोठे आश्वासन दिले.

यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री यांनी यापूर्वीच शिक्षकांचे प्रश्न का सोडवले नाहीत, असा प्रश्न करत नोव्हेंबरनंतर आपले सरकार आल्यानंतर सर्वच प्रश्न सोडवू, असा विश्वासही व्यक्त केला.

नाशिक शिक्षक मतदारसंघात पुन्हा एकदा शिंदे गटाविरुद्ध ठाकरे गट उभा ठाकला आहे. येथून महायुतीचे किशोर दराडे तर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आमनेसामने आहेत. गुळवे यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत Sanjay Raut यांचा नाशिकमध्ये मेळावा पार पडला. त्यावेळी त्यांनी राज्यात नोव्हेंबरनंतर आपलाच मुख्यमंत्री असणा आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांचे सगळे प्रश्न सुटतील, असे विधान केले.

संजय राऊत म्हणाले, शिक्षक विभागाची निवडणूक सोपी नाही. या निवडणुकीत चिन्ह नसते. त्यामुळे उमेदवाराचे नावच लक्षात ठेवावे लागणार आहे. मुंबईतील अनुभव वाईट आहेत. तेथे सर्वात जास्त मते बाद कशी होतात याचे कोडे सोडवावे लागणार आहे.

नाशिकमध्ये तर बोगस शिक्षक, बोगस शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नोंदी झाल्या आहेत. हे बोगस मदतदार शोधून काढून त्यांच्यावर खटले दाखल करावेत. तसेच त्यांची नोंदणी करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले पाहिजे, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री शिंदेंनी Eknath Shinde दिलेल्या शिक्षक पेन्शनच्या आश्वासनावर राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला. नाशिकमध्ये मुख्यमंत्री कशासाठी आले होते? त्यांचा आणि शिक्षणाचा संबंध पाहिजे. राज्यात आजपर्यंत शिक्षणाचा एवढा मोठा बाजार झाला नव्हता. मात्र आता हातात कटोरे देऊन त्यांनी शिक्षकांच्या मताचा भाव लावणारा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे.

त्यांच्याकडे आमदार, नगरसेवक विकास घेण्यासाठी खोके आहे. त्यांना आतापर्यंत कधी शिक्षकांच्या समस्या दिल्या नाहीत. आता नोव्हेंबरनंतर राज्यात आपला मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व घटकांचे प्रश्न सुटतील. पैशांची ताकद सत्ता टिकवण्यासाठी लागते, पण शिक्षकांच्या स्वाभिमानाचा कुणीही लिलाव करू शकत नाही, असेही राऊत म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT