Arvind Kejriwal : दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करा; अरविंद केजरीवाल यांच्या जामिनासाठी धावाधाव

ED Vs Delhi AAP : केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या जामिनाला स्थगिती देण्यासाठी ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Delhi Political News : दिल्लीतील कथील मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामीनासाठी धावाधाव सुरू झालेली आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने दिलेल्या जामीनास दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्या निर्णयाविरोधात केजरीवाल आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. यावेळी केलेल्या याचिकेत त्यांनी दिल्ली हायकोर्टाचा आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. मिळालेल्या जामीनास स्थगिती देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश कायद्याच्या विरुद्ध असल्याचा आरोपही केला. तसेच त्यांनी या याचिकेवर सोमवारी सकाळी सुनावणी घेण्याची विनंतीही केली आहे.

दरम्यान, दिल्लीतील कथीत मद्य घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांना 21 मार्च 2024 रोजी अटक केली होती. त्यांना गुरुवारी (20 जून) दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. या जामीनाला स्थगिती देण्यासाठी ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे दिल्ली न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आणि केजरीवाल यांचा तिहारमधील मुक्काम वाढला.

Arvind Kejriwal
Fortuner Accident Case : फॉर्च्युनर अपघात प्रकरण: आमदार मोहितेंच्या पुतण्यास न्यायालयीन कोठडी

मिळालेला जामीन रद्द झाल्याने आपने आक्रमक भूमिका घेतली आहे. देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप आपसह विरोधकांनी केला आहे. आता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात नाराजी व्यक्त करत केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची तात्काळ सोमवारी सकाळी सुनावणी घेण्याची विनंतीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. आता तेथे तात्काळ सुनावणी होणार का, झाली तर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे देशाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Arvind Kejriwal
MNS News : मनसेकडून विधानसभेची तयारी सुरु; 225 मतदारसंघात नेमणार निरीक्षक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com