Jalgaon BJP
Jalgaon BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon BJP News : जळगाव जिल्ह्यात भाजपचे आता तीन जिल्हाध्यक्ष; 'अशी' होणार निवड !

कैलास शिंदे

BJP Politics in Jalgaon : भारतीय जनता पक्षातर्फे राज्यातील जिल्हाध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात आता जळगाव व रावेर ग्रामीण तसेच जळगाव शहर असे तीन जिल्हाध्यक्ष राहणार आहे. जळगाव व रावेर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी गुरुवारी (ता. ११) चाचपणी होणार आहे. त्याबाबत प्रदेश सचिव राजेश पांडे हे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी तसेच ग्रामीण कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.

भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) जळगाव ग्रामीण व जळगाव शहर हे दोन अध्यक्षपद होते. जळगाव ग्रामीणसाठी आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) तर जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी आहेत. मात्र पक्षातर्फे आता लोकसभा मतदारसंघ निहाय दोन अध्यक्ष करण्यासह जळगाव शहरासाठी स्वतंत्र अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता जळगाव ग्रामीण व रावेर ग्रामीण आणि जळगाव शहर जिल्हाध्यक्ष असणार आहेत.

जिल्ह्यात जळगाव व रावेर हे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. दोन्ही मतदार संघात भाजपचे खासदार आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघात उन्मेश पाटील तर रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे (Raksha Khadse) या खासदार आहेत.

पक्षातर्फे जळगाव ग्रामीण (Jalgaon) जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा परिषद सदस्य मधु काटे (पाचोरा), पोपट तात्या भोळे (चाळीसगाव), एस.आर.पाटील (एरंडोल), पी.सी.पाटील (धरणगाव) हे इच्छुक आहेत. तर रावेर ग्रामीण नंदु महाजन हे इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव शहर जिल्हाध्यक्षपदासाठी चाचपणी पूर्ण झाली आहे. त्यासाठी नगरसेवक अश्‍वीन सोनवणे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख हे इच्छुक आहेत.

पक्षाचे प्रदेश सचिव राजेश पांडे (Rajesh Panday) हे दोन्ही जिल्हाध्यक्षपदाच्या चाचणीसाठी गुरुवारी (ता. ११) जळगाव येथे येत आहेत. जळगाव येथील भाजप कार्यालयात ते पदाधिकाऱ्यांशी तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत रावेर ग्रामीण व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जळगाव ग्रामीण अध्यक्षपदासाठी ते त्या-त्या भागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT