Nitin Thackray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MVP Election: मविप्र संस्थेत परिवर्तन घडणार!

ॲड. नितीन ठाकरे यांनी मविप्र संस्थेच्या निवलवडणुकीत मोहाडी येथील सभेत दावा केला.

Sampat Devgire

नाशिक : मविप्र (MVP) संस्‍था विद्येचे मंदिर असून, गेल्या पाच वर्षांत संस्‍थेला लागलेला हुकूमशाहीचा डाग पुसला जाईल. संस्‍थेत परिवर्तन घडेल, (Change in Power) असा विश्‍वास परिवर्तन पॅनलचे (Parivartan Panel) प्रमुख ॲड. नितीन ठाकरे (Nitin Thackray) यांनी व्‍यक्‍त केला. (Nitin Thackray panel leader claims change in MVP election)

मोहाडी येथे झालेल्‍या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. दरम्यान, मातेरेवाडी, वरखेडा आणि मोहाडी येथे झालेल्या सभेत परिवर्तन पॅनलतर्फे ॲड. ठाकरे यांच्‍यासह उमेदवारांनी संवाद साधला.

ॲड. ठाकरे म्‍हणाले, की गेल्या पाच वर्षांत विकास निधी ७५ कोटींनी कमी झाल्‍याचे सांगत, या मागील गौडबंगाल अद्यापही समजलेला नसल्‍याचा दावा केला.

अध्यक्षपदाचे उमेदवार माणिकराव कोकाटे म्‍हणाले, की गेल्‍या पाच वर्षांचा कारभार पाहिल्‍यास मविप्रला अन्‍य शैक्षणिक संस्‍थांसारखे खासगी रुप देण्याचा प्रयत्‍न होतो आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या रुग्‍णालयातील औषधेही बाहेरच्या खासगी मेडिकलमध्ये ५० टक्क्यांहूनही अधिक स्वस्त मिळत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. विनापावतीचे कोट्यवधी रुपये देणगी स्वरूपात स्‍वीकारले जात असल्‍याचाही आरोप त्‍यांनी केला.

सभापतिपदाचे उमेदवार बाळासाहेब क्षीरसागर म्‍हणाले, की कर्मवीरांमध्ये भेदभाव करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव निंदनीय आहे. मराठा समाजाच्या अस्मितेला डाग लावणारा असल्याचे आरोप त्‍यांनी केला. याप्रसंगी विश्वासराव मोरे, दिलीप दळवी, डी. बी. मोगल, विजय पगार, नंदकुमार बनकर, रमेशचंद्र बच्छाव, डॉ. प्रसाद सोनवणे, अमित पाटील, शिवाजी गडाख, डॉ. सयाजीराव गायकवाड, संदीप गुळवे, रवींद्र देवरे, प्रवीण जाधव, कृष्णाजी भगत, लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, शोभा बोरस्ते, शालन सोनवणे यांच्‍यासह मोहन जाधव, अविनाश वाघ, बापू सोनवणे, डी. एस. देशमुख, अमोल देशमुख आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT