Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

तेव्हा ३६ कोटी मिळायचे, आज ८०० कोटी!

Sampat Devgire

येवला : २००४ मध्ये मी आलो तेव्हा जिल्ह्याला ३६ कोटींचा निधी येत होता, आज तो निधी ८०० कोटीपर्यन्त आणला आहे. पुढील काळात नाशिक (Nashik) जिल्ह्याला उद्योग, पर्यटन, कृषी क्षेत्राच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ओळख मिळण्यासाठी तसेच कोरोनामुक्त गाव विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे असे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले.

पाटोदा गावात ग्रामपंचायत इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे व प्राथमिक आरोग्य इमारत व इतर विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच देवगाव ग्रामपंचायत इमारत व विविध विकासकामांचे उदघाटन पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, राधाकिसन सोनवणे, जयदत्त होळकर, वसंत पवार, मोहन शेलार, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, अशोक मेंगाणे, साहेबराव आहेर, रतन बोरणारे, सरपंच प्रताप पाचपुते, उपसरपंच रईस देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, कोरोना काळात विकासकामावर मर्यादा येत होती. आता निधी खर्च होऊ लागल्याने सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, यापुढेही आरोग्य विभागांतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न आणि रस्त्यांसाठी कामे करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

महाविकास आघाडी शासनाला प्रशासनाच्या कर्तृत्वाची मिळालेली साथ व जनतेची एकजूट त्यामुळे आजपर्यंत कोरोनावर मात केली, भविष्यातही त्याचा सामना करत राहू. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे,असे आवाहन भुजबळ यांनी केले. कोरोना नाकाळात सेवा देणारे डॉक्टर, आशासेविका, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी यांचा पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT