Congress leader Vasant Thakur & Threatning letter Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

कालीचरण बाबाची तक्रार केल्याने वसंत ठाकूर यांना ठार मारण्याची धमकी!

काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षांना हिंदू नावाने निनावी धमकीचे पत्र.

Sampat Devgire

नाशिक : वादग्रस्त कालीचरण या बाबाने राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्याविरोधात येथील काँग्रेस (Congress) सेवादलाचे शहराध्यक्ष (Nashik) वसंत ठाकूर (Vasant Thakur) यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे त्यांनी निनावी पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

या निनावी धमकी पत्राने खळबळ उडाली आहे. श्री. ठाकूर यांनी बाबाबत शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अज्ञात व्यक्तीने आपली ओळख लपवून `हिंदू` नावाने त्यांनी जीवे मारण्याची धमकी असलेले पत्र पाठविल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

श्री. ठाकूर यांना आज सकाळी हे पत्र प्राप्त झाले. त्या पत्रातील मजकुर असा, `वारंपार हिंदूंच्या विरोधात जाणारा **** वसंत ठाकूर तु हिंदू धर्मावर लागलेला एक मोठा कलंक असून हिंदू धर्माचे संत कालीचरण महाराजांविरोधात पोलिसांत तक्रार करताना ** नाही वाटली का?. स्वतःला हिंदू म्हणवून घेऊ नको. थांब तुला त्या गांधीकडे पाठवतो. तुला लई गांधी लागतात. कायमचाच जा गांधींकडे- हिंदू`

यासंदर्भात श्री ठाकूर म्हणाले, महात्मा गांधी हे अहिंसा व राष्ट्रवादीचे प्रतिक आहे. त्यांना जगभर प्रतिष्ठा आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरच चालण्याचा प्रयत्न मी करत असतो. तेच माझे ध्येय आहे. काँग्रेस सेवादलाने आम्हाला ते संस्कार दिलेले आहेत. मात्र श्री कालीचरण या अडाणी व आठवी पर्यंत शाळा शिकलेल्या व्यक्तीने बॅरीस्टर व भारताचे राष्ट्रपिता असलेल्या व्यक्ती विरोधात अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरावी हे कोणालाही न पटणारे आहे. त्यामुळेच मी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली. मला आलेली धमकी पाहता कालीचरण व त्यांचे अनुयायी काय दर्जाचे आहेत हे स्पष्ट होते. पोलिसांनी त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. मी मात्र काँग्रेसचा अनुयायी आहे, माझे काम मी सुरुच ठेवेन.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT