श्रेय लाटण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही

खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा विरोधकांना इशारा
MP Dr Subhash Bhamre
MP Dr Subhash BhamreSarkarnama
Published on
Updated on

सटाणा : गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून तांत्रिक मुद्द्यांमुळे प्रलंबित असलेल्या हरणबारी धरणाच्या डाव्या कालव्यासाठी शासनाने ४० कोटी रुपयांची निविदा अखेर प्रसिद्ध केली. गेल्या सात वर्षांपासून माझ्या अथक प्रयत्नांना यश आल्याने बागलाणवासियांचे मोठे स्वप्न साकार होणार आहे. मात्र, मी केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय लाटण्याचा कुणी केविलवाणा प्रयत्न प्रयत्न करीत असेल तो खपवून घेतला जाणार नाही, असा संतप्त इशारा धुळ्याचे (Dhule) खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांनी दिला आहे.

MP Dr Subhash Bhamre
`त्या` उड्डाणपुलाला विरोधामागे नेत्यांचे राजकारण की `अर्थकारण`

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉ. भामरे म्हणाले, बागलाण तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता २०१७ मध्ये भाजपकाळात मंजूर झाली होती. त्यासाठी लागणारा १०० कोटी रुपयांपर्यंतचा निधीही मी उपलब्ध करून ठेवलेला होता. सिंचन प्रकल्पाच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात मला यश आले होते. तालुक्यातील सर्व प्रकल्प शासकीय मापदंडात बसत नसल्याने प्रलंबित होते, मी ते सर्व मापदंडात बसवले. नंतर त्यांची सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन त्यांना निधीही उपलब्ध करून घेतला. २०१७ नंतर बागलाण तालुक्यातील या प्रकल्पांना मंजुरी मिळून निधीही उपलब्ध झाला.

MP Dr Subhash Bhamre
येणाऱ्या निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू

नवीन तंत्रज्ञानाने डिझाईन करून प्रकल्प करावे, जेणेकरून प्रकल्पांना देखभाल दुरुस्तीची आवश्यकता भासणार नाही, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्याने पाटचारीऐवजी जलवाहिनीद्वारे पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन केल्याचे खासदार भामरे म्हणाले.

नवीन डिझाईनचे अंदाजपत्रके नाशिकच्या सी. डी. ओ. मेरी यांच्याकडे सादर करण्यात आले. तांत्रिक मंजुरी व इतर संमती या कामांसाठी एक वर्षाचा कालावधी गेला त्यानंतर कोरोना महामारीमुळे दोन वर्षे सर्व कामे ठप्प होते. म्हणून पुन्हा दोन वर्षे या प्रकल्पाला विलंब झाला. आता ४० कोटींची निविदा प्रसिद्ध झाली.

हरणबारी डाव्या कालव्याचा प्रश्‍न मार्गी लागला. लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या कार्यकाळात हे यश मिळाले म्हणून मी आनंदी आहे. हरणबारी डाव्या कालव्याचे काम आता सुरू होईल, तळवाडे भामेर पोहच कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कठगड बंधाऱ्याचे व इतर छोट्या- मोठ्या कामांसाठी युती शासनाच्या काळात मी निधी उपलब्ध करून ठेवला होता. हरणबारी उजवा कालव्याचे सर्वेक्षण झाले आहे, असे ते म्हणाले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com