NMC Election: काँग्रेस आपल्या हिम्मत्तीवर निवडणुका लढवणार

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने सुरु केल्या बैठका
Nashik Municipal Corporation Election News
Nashik Municipal Corporation Election NewsSarkarnama
Published on
Updated on

सिडको : मतदार नोंदणी प्रभाग निहाय सुरु करावी. निवडणुका आपल्या हिम्मत्तीवर लढवाव्या तसेच अनेक उमेदवार आपल्या संपर्कात आहेत. त्यामुळे सर्व जागा काँग्रेस लढवू शकतो. नविन युवकांना संधी देण्यात येईल. फक्त निवडणुका आल्या म्हणून काम करण्यापेक्षा कायम लोकांचे काम करत रहा नुकत्याच झालेल्या पंचायत समित्या, ज़िल्हा परिषद मध्ये काँग्रेस (Congress) एक नंबर होता तसेंच महानगर पालिका मध्ये होण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन (Nashik) काँग्रेस माजी शहराध्यक्ष शरद आहेर (Sharad Aher) यांनी केले.

Nashik Municipal Corporation Election News
येणाऱ्या निवडणुकीत भाजप हाच आमचा मुख्य शत्रू

ब्लॉक काँग्रेस तर्फे संगठनात्मक तयारी बैठक तसेच संगणकीय सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आले.ब्लॉक काँग्रेस पक्ष येणाऱ्या महानगर पालिका निवडणूक पूर्ण तयारीने लढवणार असून त्या पार्श्वभूमीवर बैठक सिडको मध्ये घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सहप्रभारी ब्रिजेशजी दत्त होते. बैठकीत संगठना वाढवण्यासाठी सर्व फ्रंटल कार्यरत करून कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असून त्यासाठी रणराती करण्यात आली. (Nashik Municipal Corporation Election News)

Nashik Municipal Corporation Election News
`त्या` उड्डाणपुलाला विरोधामागे नेत्यांचे राजकारण की `अर्थकारण`

येणाऱ्या महानगर पालिका च्या उमेदवारची चाचपणी करण्यात आली.त्यात प्रभाग निहाय उमेदवारी वर चर्चा करण्यात आली. काँग्रेस ने दिलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवाव्या अशी सूचना डॉ. शोभाताई बच्छाव यांनी केल्या. अन्य राजकीय पक्षांशी आघाडी संदर्भात निर्णय प्रदेश वरून येईल पण स्वबलावर तयारी करावी अशी सूचना कारण्यात आली. महिलांना ५० टक्के उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली.

अण्णासाहेब पाटील यांनी प्रदेश वरून निवडणुकीला यंत्रणा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून कार्यकर्त्यांना हुरूप येईल अशी सूचना केली,लक्ष्मण जायभावे यांनी निवडणुक जिंकून सोनिया गांधी यांचे हाथ बळकट करू अशी ग्वाही दिली.उत्तम राव बडदे यांनी जुन्या कार्यकर्त्याना सोबत घेऊन काम करावे अशी सूचना केली.

वंदनाताई पाटील यांनी बीजेपी विरुद्ध जनता महागाई ने त्रस्त आहे त्याचा फायदा करून घ्यावा अशी सूचना करण्यात आली.तर मीराताई साबळे यांनी काँग्रेस ला जनता मतदार करेल पण लोकांपर्यंत पोहचणे महत्वाचं आहे अशी सूचना केली. तसेच ब्रिजेश दत्त यांनी सिडको मधील बूथ कमिटी पूर्ण करून त्यांचे शिबीर घेण्यात येईल.अशी सूचना केली.जनतेसाठी रस्त्यावर उतरा, लोकांमधे जाऊन काम करा अश्या सूचना दिली.

लाटा येतील जातील पण जनतेसाठी काम केले तर जनता कायम सोबत राहते अशी माहिती दिली. नाना पटोले काम करत आहेत त्यांचे हाथ बळकट करा. अशी हाक दिली. तसेच महानगर पालिका लढवण्या साठी प्रदेश सर्व मदत करेल अशी माहिती दिली.

यावेळी भरत टाकेकर, संतू पाटील जायभावे,गौरव सोनार, डॉ. प्रशांत आंबरे, सौं. चारुशीला शिरोडे, मीना गांगुर्डे, सुषमा पाटील, भास्कर राव मैंद, सुरेश जाधव, सुभाष पाटील,अशोक लहामगे, आनंदा देसले, धोंडीराम बोडके, डॉ. अमृत सोनवणे, के. आढाव, चेतन फेगडे, प्रमोद धोंगडे, सिद्धार्थ मोरे,नाना भामरे, माणिक जायभावे,देवेंद्र देशपांडे, नितेश निकम, शिवम आलई, भाऊसाहेब पाटील, मनोज साठे, उमेश डुंबरे, गणेश पाटील, गोरख जगताप, हर्षद पाटील, विजय खैरनार, भरत पाटील उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com