Shaan-e-Hind Moves Bombay High Court, Tipu Sultan photo controversy, Malegaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Tipu Sultan Controversy : टिपू सुलतानचा फोटो दालनात लावण्याची परवानगी द्या, मालेगावच्या उपमहापौरांची न्यायालयात याचिका

Shaan-e-Hind Moves Bombay High Court : टिपू सुलतानच्या फोटोवरुन मालेगावात आणखी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मालेगावच्या उपमहापौरांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Ganesh Sonawane

Tipu Sultan photo controversy : समाजवादी पक्षाच्या मालेगावच्या उपमहापौर शान- ए-हिंद यांनी महापालिका दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता. त्यावरुन वातावरण तापलं होतं. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केल्यानंतर महापालिका प्रशासनाने टिपू सुलतानचा फोटो हटवला होता.

दरम्यान आता उपमहापौर शान यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी सरकार, महापालिका व पोलिस प्रशासनास प्रतिवादी करत टिपू सुलतान यांचा फोटो लावण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन आणखी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात उपमहापौर शान-ए-हिंद यांनी महापालिकेच्या नूतन दालनातून आपले कामकाज सुरू केले होते. या वेळी दालनात त्यांनी महापुरुषांच्या फोटोसह टिपू सुलतान यांचा फोटो लावला होता. या फोटोवरून भाजपसह शिवसेना आक्रमक झाली. भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांनी याविरोधात ठिय्या आंदोलन केले होते. भाजपने टिपूचा उदोउदो खपवून घेणार नाही असा इशारा देत निषेध केला होता.

दरम्यान, काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत शान यांच्या दालनाबाहेर आंदोलन करत फोटो हटवण्याची मागणी केली होती. यानंतर महापालिका प्रशासनाने फोटो हटवला होता. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर समाजवादीचे गटनेते मुस्तकिम - डिग्निटी यांनी या प्रश्नी आरपारची लढाई लढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या मुद्द्यावरुन सध्या मालेगावचे राजकीय वातावरण गरम आहे. उपमहापौर शान-ए-हिंद यांचे दालन गेल्या आठ दिवसांपासून कुलूपबंद आहे. टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे दालनाबाहेर बंदोबस्त होता. मात्र, फोटो हटवल्यानंतरही दालन अद्याप बंदच आहे. या वादावर महापालिका प्रशासन कायदेशीर सल्ला घेत आहे.

महापालिकेने शासनस्तरावर या संदर्भात अभिप्राय मागवला आहे. हा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये झाशीची राणी व टिपू सुलतान यांच्या फोटोचा उल्लेख असल्याचा पुरावा याचिकेद्वारे देण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेत टिपू सुलतान यांचे पोर्ट्रेट लावले आहे. भारत सरकारच्या अधिकृत ट्विटरवर ७ जानेवारी २०२५ ला प्रसिद्ध पोस्टमध्ये संविधानातील चित्राचा शब्दांशः उल्लेख असल्याचे नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT