Eknath Khadse Birthday : 40 वर्षे भाजपमध्ये घालवली, अमृतमहोत्सवाला काही नेते आले नाहीत; खडसेंना दु:ख... बोलताना झाले भावूक

Eknath Khadse On BJP : एकनाथ खडसे यांनी भाजपमधील राज्यातील व केंद्रातील अनेक वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण दिलं होतं. निमंत्रण पत्रिकेत नाव व फोटोही छापले. मात्र, एकही वरिष्ठ भाजप नेता सोहळ्याला गेला नाही.
Eknath Khadse Fraud Case
Eknath Khadse Fraud CaseSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse BJP : जेष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांचा वाढदिवस २ सप्टेंबरला असतो, त्यानिमित्ताने त्यांनी दोन दिवस आधी ३० ऑगस्टला मुक्ताईनगर (कोथळी)येथे आपल्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या सोहळ्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या राज्य तसेच केंद्रातील अनेक वरिष्ठ नेत्यांना निमंत्रण दिलं होतं. मात्र, भाजप नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने एकनाथ खडसेंना वाईट वाटलं असून दु:ख झालं आहे.

खडसे म्हणाले, अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त मी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यातले अनेक जण आले, पण भाजपचे काही नेते आले नाहीत. आपण राजकारणातील जवळपास ४० वर्षे भारतीय जनता पार्टीतच काम केले आहे. त्यामुळे हे नेते येतील, अशी अपेक्षा होती. मात्र ते आले नाहीत, याचे दु:ख आहे, अशी खंत ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

खडसेंचा अमृतमहोत्सवी सोहळा ३० ऑगस्टला कोथळीतील (मुक्ताईनगर) जुन्या मुक्ताई मंदिराच्या प्रांगणात पार पडला. सोहळ्याला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासह अन्य पक्षांचे राज्यातील नेते उपस्थित होते. मात्र, भाजप व शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. खडसेंच्या कार्यक्रमाला एकाही भाजपच्या वरिष्ठ नेत्याने हजेरी लावली नाही.

Eknath Khadse Fraud Case
Eknath Khadse : खडसेंनी मैत्रीचा हात पुढे केला, भाजप नेत्यांनी तो झटकला ; न फडणवीस आले, न महाजन !

खडसेंनी तारखेनुसार २ सप्टेंबर रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या भेटीसाठी जिल्ह्यातील विविध भागांतून विविध पक्षांचे हजारो कार्यकर्ते मुक्ताईनगरात दाखल झाले होते. खडसेंनी मुक्ताई मंदिर परिसरातच या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी खडसे बोलत होते.

खडसे पुढे म्हणाले, राजकीय क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीचा अमृतमहोत्सवी सोहळा काही कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसतो. तो एक कौटुंबिक सोहळा असतो. त्यामुळे अशा ठिकाणी राजकीय मतभेद बाजूला ठेवून जाणे ही खरी राजकीय संस्कृती असते. त्याच भावनेतून ३० ऑगस्टला झालेल्या कार्यक्रमास राज्यभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिले, पण आपण ज्या पक्षासाठी ४० वर्षे काम केले, त्या पक्षातील काही नेते येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ते आले नाहीत, याची खंत असल्याचं खडसे म्हणाले.

असे असले तरी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संजय कुटे यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याचं त्यांनी सांगितलं.

Eknath Khadse Fraud Case
Eknath Khadse : "शरद पवारांनी आसरा दिल्यानेच..."; एकनाथ खडसे भावूक, भरकार्यक्रमात सगळे सांगितले

प्रमुख नेते आले नसले तरी भाजपतील अनेक कार्यकर्ते येऊन भेटत आहेत. या कार्यकर्त्यांशी आपले ऋणानुबंध आहेत. त्यांचा आपल्याला विरोध नाही, तर भाजपतील काही नेत्यांचाच विरोध आहे, हे दिसून आले. आजचा कार्यक्रम वेगळा आहे. त्यामुळे आपण त्याविषयी जास्त बोलणार नाही, असे खडसेंनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com