Performance in Tamasha
Performance in Tamasha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Police: तमाशात नाचण्यासाठी हव्यात ‘मुख्यालयात’ ड्युटी?

Sampat Devgire

जळगाव : कुठलंही काम न करता महिन्याकाठी वेतन घेऊन दुसरेच धंदे करायचे.. मनमर्जीप्रमाणे यंत्रणा राबवून घ्यायची.. वेळप्रसंगी वरिष्ठ पोलिस (Jalgaon Police) अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींकरवी (People representitives) दबाव आणायचा.. आता एका कर्मचाऱ्याचा तमाशात (Pageant) नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला असून सहाय्यक फौजदाराचे जिल्‍हा पोलिस अधीक्षकांनी निलंबनाचे आदेश पारित केले आहेत. मात्र, उर्वरित ‘छुप्या’ रुस्तमांचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. (Jalgaon Police headoffice in trouble again due appointments)

गेल्या महिन्यात २४ ऑगस्टला निवृत्तीनगरात भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे, ता. जळगाव) या वाळू व्यावसायिक तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणात भूषण रघुनाथ सपकाळे (३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) व मनीष नरेंद्र पाटील (२२, रा.आव्हाणे, ता. जळगाव) या दोघांना अटक झाली आहे. या घटनेच्या काही दिवस आधीच भूषण सपकाळे याने गाव जत्रेत तमाशाचे आयोजन केले होते.

या तमाशामध्ये भटू नेरकरसह एका अन्य कर्मचाऱ्याने हजेरी लावल्याचे समोर आले. ते दोघे तमाशाच्या स्टेजवर यथेच्छ ठुमके लावून नाचले होते. खुनाच्या घटनेनंतर पोलिस आणि वाळू माफिया यांचे गॅटमॅट (मधुर संबंध) पुनश्‍च एकदा उघडकीस येऊन वाळू व्यावसायिकाने आयोजित केलेल्या तमाशात नाचणाऱ्या सहाय्यक फौजदार भटू नेरकर याचे निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पारीत केले आहेत. तर, दुसऱ्या कर्मचाऱ्यांचा या प्रकरणात काय आणि किती संबंध आहे; याचा शोध घेत त्याच्यावरही कठोर कारवाईचे संकेत डॉ. मुंढे यांनी दिले आहेत.

मुख्यालयातील छुपे रुस्तम कोण?

पोलिस मुख्यालयाअंतर्गत जवळपास साडेसहाशेवर पोलिस कर्मचारी तैनातीला आहेत. त्यात कमांडो पथक, राखीव पोलिस बल, दंगानियंत्रण पथक, कार्यालयीन कर्मचारी मंडळी वगळता इतरांना काम न करताच शासनाचा पगार दिला जातोय अशी परिस्थिती आहे. जिल्ह्याभरातील विविध पोलिस ठाण्यात ड्युट्या करून आणि आता पैशांनी गब्बर झाल्यावर या मंडळींना कुठल्याही ड्युट्या न करता पगार अन्‌ रुबाब हवा असल्याने मुख्यालयात अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी ही मंडळी लपून बसली आहे.

हजेरी मास्तरांवर कारवाई केव्हा?

पोलिस मुख्यालयातील हजेरी मास्तरांना महिन्याकाठी २ ते १० हजारांपर्यंत लाच द्यायची अन्‌ काम न करताच शासनाचा पगार लुबाडायचा धंदा सर्रास सुरु आहे. केवळ हजेरी मास्तर या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवतो. तमाशात नाचणारा भटू नेरकर याची ड्युटी अशीच लागली होती. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी कधीच पोलिस कर्मचारी लावला जात नाही. त्याचप्रमाणे पोलिस वसाहतीत रात्र गस्त, दिवसाची गस्त, मैदान पिकेट, लाईन पिकेट, पाणी सेाडणारा, व्हीआयपी बंदोबस्ताची ऐस्कॉट, लोकप्रतिनिधींचे गरजेपेक्षा जास्तबॉडीगार्ड, अशा विविध ठिकाणी हे छुपे रुस्तम लपून बसले आहेत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT