Eknath Khadse News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून; खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची खडसेंची मागणी

NCP Jalgaon News : एकनाथ खडसे यांनी गोंडगाव येथे जावून पिडीत मुलीच्या माता पित्याचे सांत्वन केले.

सरकारनामा ब्यूरो

Eknath Khadse News : जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गोंडगाव येथे जावून पिडीत मुलीच्या माता पित्याचे सांत्वन केले. त्यांच्या समवेत माजी आमदार दिलीप वाघ, अॅड. रोहिणी खडसे, पाचोरा येथील शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी उपस्थित होत्या. खडसे म्हणाले, ही अत्यंत घृणास्पद घटना आहे. त्याचा आपण निषेध करतो.

या प्रकरणी शासनाने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून नराधम आरोपीला फाशीच्या शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे. यासाठी सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक करावी, अशी आपली शासनाला मागणी आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबाला शासनातर्फे आर्थिक मदत व्हावी, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भ्रमणध्वीवरून संपर्क करून पिडीतेच्या पालकांशी संवाद साधून त्यांचे सात्वंन केले होते. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी हा संवाद घडवून आणला होता. त्यानंतर रविवारी खडसे यांनी पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT