Birsa fighters delegation at Taloda Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Political News: धनगर आरक्षणावरून बिरसा फायटर्सने बावनकुळेंना खडसावले!

Trible leaders of Birsa Fighter organisation warns Chandrashekhar Bawankule- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनगर समाजाचा आदिवासींत समावेश करण्यासाठी पत्र दिले

Sampat Devgire

Trible leaders on BJP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी पत्र दिले आहे. त्याची तीव्र प्रतिक्रिया आदिवासी संघटनांत उमटली आहे. बावनकुळे यांनी राजकीय डावपेच काहीही खेळावेत, मात्र आदिवासींवर अन्याय होईल असे काम करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात नंदुरबार (Nandurbar) येथील बिरसा फायटर्स संघटनेने भाजप (BJP) नेते बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना इशारा दिला आहे. धनगर समाज हा कोणत्याही स्थितीत आदिवासी (Trible) जमातीच्या निकषात बसत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तळोदा येथे तहसीलदार गिरीश वखारे यांना बिरसा फायटर्सच्या पदाधिकारी, सदस्यांनी निवेदन दिले. या वेळी आदिवासी घटकांत धनगर अथवा इतर कोणत्याही समाजाच्या समावेशास विरोध करण्यात आला. याबाबत आदिवासी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये, अन्यथा त्याला चोख उत्तर दिले जाईल, असा बिरसा फायटर्सचे राजेंद्र पाडवी यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, यासाठी राज्य सरकारला पत्र दिले आहे.

बावनकुळे यांचा जाहीर निषेध नोंदवून, आदिवासींमध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये. त्यासाठी आम्ही अतिशय जागरूक आहोत. राजकीय हेतू ठेऊन कोणी चुकीच्या गोष्टी करीत असल्यास त्याला विरोध करू, असे निवेदन अक्कलकुवा तहसीलदार रामजी राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान यांना दिले आहे.

बिरसा फायटर्सचे जिल्हाध्यक्ष भरत पावरा, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, सहसचिव सतीश पाडवी, उपाध्यक्ष प्रदीप पटले, पाल्हाबार-रापापूर शाखाध्यक्ष शिवाजी तडवी, उपाध्यक्ष गणेश पाडवी, नरेश पवार, मालसिंग वसावे, बहादूर ठाकरे, बाबूलाल वळवी, सचिन ठाकरे, पंकज पाडवी, दीपक पाडवी, किरण पाडवी, आकाश पाडवी, संदीप पाडवी, अजय पाडवी, प्रवीण पाडवी यांच्या सह्या आहेत.

धनगर ही जात आहे, जमात नाही. ओरॉन, धांगड जमातीची धनगर जातीशी तिळमात्र संबंध नाही. धनगर आदिवासी नाही. धनगर समाज आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही. धनगर समाजाला स्वतंत्र ३.५ टक्के आरक्षण असतानादेखील काही लोकप्रतिनिधींकडून राजकीय फायद्यासाठी असंवैधानिक मागणी करण्यात येत आहे. या असंवैधानिक मागणीला बिरसा फायटर्सचा तीव्र विरोध आहे.

-राजेंद्र पाडवी, राज्य महासचिव, बिरसा फायटर्स.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT