Dada Bhuse News : कांदा प्रश्नावर मंत्र्यांतच विसंवाद...

The meeting of onion traders with Guardian Minister Dada Bhuse was fruitless-कृषिमंत्री सत्तार म्हणतात कारवाई करू, तर पालकमंत्री भुसे म्हणतात शिष्टाई करू!
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Onion Issue Undecided : कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या लिलाव बंदमुळे बाजार समित्या ठप्प झाल्या आहेत. याबाबत आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतदेखील तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. (There was misscommunication in Ministers on Onion traders issue)

कांदा लिलाव बंदबाबत (Nashik) व्यापारी आणि पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात काहीही तोडगा निघाला नाही. व्यापाऱ्यांचे प्रश्न केंद्र शासनाशी (Centre Government) निगडित असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

Dada Bhuse
Nashik Farmers News : नाशिकचे कांदा व्यापारी दाबणार राज्य सरकारचे नाक!

दरम्यान, या विषयावर राज्य शासनातील मंत्र्यांतदेखील विसंवाद असल्याचे दिसते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या भूमिकेतदेखील विरोधाभास दिसला. कृषिमंत्र्यांनी बंद पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले आहे. दादा भुसे यांनी मात्र कारवाईऐवजी तोडगा काढण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी येत्या २६ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली.

जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या बहिष्काराच्या अनुषंगाने आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. व्यापाऱ्यांच्या काही मागण्या केंद्र शासन स्तरावरील आणि धोरणात्मक आहेत. कृषी, पणनमंत्री अब्दुल सत्तार मंगळवारी बैठक घेणार असल्याने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत विविध कांदा व्यापारी उपस्थित होते. कांदा व्यापाऱ्यांनी नाफेडच्या विक्रीवर निर्बंध घालावेत, यांसह विविध अडचणी मांडल्या. कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही तोडगा नसल्याचे त्यांनी सागितले.

Dada Bhuse
Abdul Sattar News : सत्तार संतापले, बंद पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार!

बैठकीनंतर भुसे म्हणाले, की कांदा व्यापाऱ्यांच्या अनेक मागण्या केंद्र तसेच राज्य सरकारशी निगडित आहेत, तसेच येत्या मंगळवारी (ता.२६) कृषिमंत्र्यांकडे बैठक होणार आहे. मात्र, असे असले तरी हा विषय चर्चेतूनच सुटणार असल्याने व्यापाऱ्याशी पुन्हा पुन्हा चर्चा करून तोडगा काढणे हाच मार्ग असल्याचे सांगितले. तसेच नाफेडने केलेल्या खरेदीबाबत आज सायंकाळपर्यंत खरेदीबाबत माहिती मागितली आहे. कोणत्या शेतकऱ्यांची आणि कोणत्या दराने खरेदी केली याची माहिती मिळाल्यावर बोलू असे स्पष्ट केले.

Dada Bhuse
Eknath Shinde News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com